*शहादा येथे 8 मार्चला विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा, दुर्गम भागातील नागरिकांना लाभ; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची उपस्थिती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहादा येथे 8 मार्चला विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा, दुर्गम भागातील नागरिकांना लाभ; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची उपस्थिती*
*शहादा येथे 8 मार्चला विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा, दुर्गम भागातील नागरिकांना लाभ; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची उपस्थिती*
नंदूरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली 8 मार्च 2026 रोजी शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजना व कायदेविषयक सेवांचा भव्य महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार, तालुका विधी सेवा समिती शहादा आणि तालुका वकील संघ, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व इतर शासकिय कार्यालयांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी, दिव्यांग, रूग्ण, ज्येष्ठ नागरिक, उसतोड कामगार, महिला, मुले तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून पात्र लाभार्थ्यांची नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज प्रक्रिया सुलभकरणार आहेत. तसेच मोफत विधी सेवा, शासनाच्या विविध योजना, विमा योजना आणि सामाजिक सुरक्षा योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना एका ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार किशोर आर. पेठकर यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या विशेष उपस्थितीमुळे या महामेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेसाठी विधी सेवेचे दरवाजे खुले होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



