*मनरेगा व पंतप्रधान घरकुल योजनेचे अनुदान 3 महिन्यांपासून रखडले, बिरसा फायटर्स़चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मनरेगा व पंतप्रधान घरकुल योजनेचे अनुदान 3 महिन्यांपासून रखडले, बिरसा फायटर्स़चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
*मनरेगा व पंतप्रधान घरकुल योजनेचे अनुदान 3 महिन्यांपासून रखडले, बिरसा फायटर्स़चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन*
शहादा(प्रतिनिधी):-मनरेगा योजना अंतर्गत व पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना मागील 3 महिन्यांपासून अनुदान -पैसे मिळाले नाहीत, लाभार्थ्यांना ते अनुदान मिळावे, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहादा तालुक्यात मनरेगा अंतर्गत विहीर सिंचन व प्रधान मंत्री घरकुल योजना अंतर्गत मागील 3 महिन्यांपासून लाभार्थ्यांना अनुदान -पैसे मिळत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मनरेगा योजना अंतर्गत व पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना मागील 3 महिन्याचे अनुदान त्वरित मिळावे, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून गटविकास अधिकारी शहादा यांच्या कडे करण्यात आली आहे.