*सरदार पटेल प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सरदार पटेल प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न*
*सरदार पटेल प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सरदार पटेल प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ तसेच "अक्षर शब्दांची अंगत पंगत"पुस्तक प्रकाशन संपन्न. यावेळी सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेतील पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रमणदादा पाटील, उपाध्यक्ष डॉ. वसंत चौधरी, सरदार पटेल प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सितादेवी चौरे, अभिनव विद्यालयाचे प्राचार्य टी.आर. पाटील, सुरेश पवार, वसंत पाटील, कोकिळा पाटील, लक्ष्मण पाटील, सुनिल भदाणे, गणेश चौरे, अंकित गावित, गुलाब बागुल यांच्या हस्ते सरस्वती पूजन दीपप्रज्वलन तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाळेतील उपशिक्षिका यांनी मान्यवरांच्या स्वागतार्थ स्वागतगीत सादर केले. यानंतर "अक्षर शब्दांची अंगत पंगत" या विद्यार्थी व शिक्षक यांनी तयार केलेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त च्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच सिंहावलोकन ज्येष्ठ शिक्षिका रेवती भदाणे यांनी केले. प्रसंगी सुरेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
सुनिल भदाणे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा वापर सुजाण नागरिक घडवण्यासाठी व देशाच्या प्रगतीसाठी करावा असे सांगितले. गणेश चौरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना वेळेचा सदुपयोग कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
बालवाडी आणि इयत्ता पहिली ते चौथी मधील एकूण 150 विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षा, क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळवली.
सुरेशजी पवार, वसंतभाई पाटील, गणेश चौरे, सुनिल भदाणे लक्ष्मण पाटील या दात्यांनी ग्रंथालयाला पुस्तके देण्याचे जाहीर केले. अध्यक्षीय भाषणात शाळेचे अध्यक्ष रमण पाटील यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देत त्यांनी जिद्दीने व ध्येयाने मिळविलेल्या बक्षीसांबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सितादेवी चौरे यांनी सादर केले. सूत्रसंचालन राहुल पटेल, अमोल पाटील यांनी व आभार प्रदर्शन प्रशांत पाटील यांनी केले. अशाप्रकारे विद्यार्थी गुणगौरव सोहळा व हस्तलिखित प्रकाशन सोहळा पार पडला.



