*श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती संकल्प हेतु, मथुरा गुणगौरव महिमा (कथा) व श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती संकल्प हेतु, मथुरा गुणगौरव महिमा (कथा) व श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचे आयोजन*
*श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती संकल्प हेतु, मथुरा गुणगौरव महिमा (कथा) व श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा हे परकीय मोगल आक्रमणकर्ते यांनी विध्वंस केली होती. भगवान श्रीकृष्ण यांची मूळ जन्मभूमी मुक्त व्हावी या उदात्त हेतुने श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचावतीने संपूर्ण भारतात महायज्ञ अनुष्ठान घेतले जात आहे. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा न्यासाचा वतीने दिनांक 26 ते 28 फेब्रुवारी असे तीन दिवसीय मथुरा गुणगौरव महिमा (कथा) मोठा मारुती मंदिर येथे दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत आयोजित केली आहे. तसेच 1 मार्च रविवार रोजी भव्य अश्या श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर येथे करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुळ इतिहास काय आहे, श्रीकृष्ण मंदिर परकीय आक्रमणकर्ते यांनी कश्या क्रूर पध्दतीने मंदिराचा विध्वंस केला त्याचे विवेचन मथुरा गुणगौरव कथेचा माध्यमातून वेदमूर्ती खगेंद्र महाराज बुवा करणार आहेत. तसेच श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञ या अध्यात्मिक अनुष्ठान श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीचा लढ्यात बळ मिळावे या अनुषंगाने केले आहे. या कथेसाठी आणि महायज्ञात सहभागी होण्यासाठी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे मुख्य याचिककर्ता पंडित दिनेशजी शर्मा फलाहारी महाराज मथुरा व न्यासाचे राष्ट्रीय महामंत्री शंकरजी वराडकर हे उपस्थित राहणार आहेत, तरी हिंदु माता भगिनी, बंधुंनी यांनी दि 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान दुपारी 2 ते 5 वेळात होणारी मथुरा गुणगौरव महिमा कथेचा तर दि. 1 मार्च रविवारी गजानन महाराज मंदिर येथे होणाऱ्या श्रीलक्ष्मी नारायण महायज्ञाचा लाभ घेण्याचे आवाहन न्यासाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता तथा विभागीय अध्यक्ष डॉ.नरेंद्र पाटील, जिल्हा अध्यक्षा राजश्री सोनार व श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास नंदुरबार जिल्हाचा वतीने करण्यात आले आहे.



