*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे संत गाडगे बाबा यांची 150 वी जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे संत गाडगे बाबा यांची 150 वी जयंती साजरी*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे संत गाडगे बाबा यांची 150 वी जयंती साजरी*
तळोदा(प्रतिनिधी):-माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे संत
गाडगे बाबा यांची 150 वी जयंती मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम भील होते. तर प्रमुख वक्ते संदीप मोरे, विलास मगरे
होते. सुरुवातीला संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गाडगे बाबा यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते संदीप मोरे यांनी सांगितले की, संत गाडगे बाबा यांचे दहा सुत्र म्हणजे माणसात देवपण पाहणे होय. माणसाच्या जीवनात ज्या गोष्टीची गरज आहे ती सेवाभावी वृत्तीने पुरवणे म्हणजे ईश्वर सेवा करणे होय असे त्यांनी सांगितले. तसेच विलास मगरे यांनी सांगितले की, संत गाडगे महाराज याची वेशभूषा पाहून लोक त्यांना
नावे ठेवायचे परंतु ते जेव्हा रात्री कीर्तनाला उभे राहायचे त्यावेळी ते
लोकांच्या मनात असलेली अंधश्रद्धचे
निर्मूलन करायचे, त्यांना शिक्षण, आरोग्य याचे महत्त्व पटवून द्यायचे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम भील यांनी सांगितले की संत गाडगे बाबा हे दिवसा गावात असलेली घान साफ करायचे आणि रात्री कीर्तन करून लोकांच्या मनातील
अज्ञान, अंधश्रद्धा निर्मूलन करायचे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान योजना सुरू करण्यात आली होती. असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साळुंखे यांनी केले तर आभार पंकज खेडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास पाडवी, राजेंद्र ढोडरे, सुदाम जांभोरे, संतोष राठोड, मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.



