*खंडित वीज पुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम, पालिकेची तत्परता,शहरातील अनेक प्रभागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खंडित वीज पुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम, पालिकेची तत्परता,शहरातील अनेक प्रभागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा*
*खंडित वीज पुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम, पालिकेची तत्परता,शहरातील अनेक प्रभागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आज दिवसभर नंदुरबार शहरात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने, शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी योग्य प्रमाणात होऊ शकला नाही. नागरिकांना पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून नगरपालिकेकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.
शहरात आज सकाळी 11 वाजेपासून विद्युत पुरवठा खंडित होता. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाल्याचे दिसून आले. दिवसभर वीज पुरवठा बंद असल्यामुळे पालिकेचा बूस्टर पंपांवरून जनरेटरच्या सहायाने जलकुंभात पाणी सोडण्यात आले. तरी, देखील कमी दाब्याच्या पट्ट्यामुळे जलकुंभापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. त्याच्याच परिणाम म्हणून शहरातील अनेक भागांमध्ये योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करता आलेला नाही. ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला नाही त्या भागांमध्ये पालिकेचा टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. मंगळवारी शहरात पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पालिका पाणीपुरवठा प्रशासन विभागातर्फे करण्यात आले आहे.