*पिंपळनेर तिहेरी हत्याकांड प्रकरणी, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी,राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी व जिल्हापोलिस अधीक्षक यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पिंपळनेर तिहेरी हत्याकांड प्रकरणी, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी,राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी व जिल्हापोलिस अधीक्षक यांना निवेदन*
*पिंपळनेर तिहेरी हत्याकांड प्रकरणी, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी,राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी व जिल्हापोलिस अधीक्षक यांना निवेदन*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-पिंपळनेर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी यासाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा यांनी निवेदन दिले. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला हादरवून टाकणारी घटना 19 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपळनेर ता. साक्री जिल्हा. धूळे येथील साखरपुडा समारंभात किरकोळ कारणावरून वादविवाद होऊन शुल्लक कारणावरून गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनी शैलेश सुरेश गोसावी वय 29, सुरेश सुपडूगीर गोसावी वय 55, देवेंद्र ज्ञानेश्वर पवार वय 35 रा.साक्री या तिघांवर शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. तर पंकजगीर अशोकगीर गोसावी, सागर मोजगीर गोसावी या दोघांना वार करून जखमी केले. यामूळे संपूर्ण महाराष्ट्रासह गोसावी समाजात संतापाची लाट उसळली आहे.व शोककळा पसरली आहे. याप्रकरणी कांतिलाल ऊर्फ कन्हैया गोस्वामी, जसवंतगिरी गोपालगिरी गोस्वामी, महेंद्र गोस्वामी व अनिल हटू गोस्वामी रा. सोनगड. जि.तापी (गुजरात राज्य) यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या मारेकऱ्यांनी अतिशय पूर्वनियोजित कट करून हत्या केल्याचे बोलले जात आहे. यातील आरोपींनी सोशल मिडियावर चिथावणी देणारे व्हिडिओ देखील प्रसारित केले आहेत. तरी संबंधित दोषींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून प्रख्यात विधितज्ञ ॲड. उज्वल निकम यांच्याकडे हा खटला चालवायला देऊन या सराईत गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. व खुन करण्यात आलेल्या कुटूंबियांना न्याय मिळवून द्यावा. यासाठी आज नंदूरबार येथील अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे व जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा, उत्तर महाराष्ट्र संघटक प्रमुख अनिल जावरे, जिल्हा संघटक गंगाराम वसावे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रभू तडवी, जिल्हा सहसंपर्कप्रमुख तुषार नाईक यांनी लेखी निवेदन सादर केले.



