*महिला महाविद्यालयात एक दिवस स्वतःसाठी हा उपक्रम साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महिला महाविद्यालयात एक दिवस स्वतःसाठी हा उपक्रम साजरा*
*महिला महाविद्यालयात एक दिवस स्वतःसाठी हा उपक्रम साजरा*
शहादा(प्रतिनिधी):-येथील सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महिला महाविद्यालय शहादा च्या विद्यार्थिनींनी एक दिवस स्वतःसाठी हा उपक्रम राबविण्यात करण्यात आला.
एक महिला म्हणून जगत असताना आपल्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते एक स्त्री म्हणून आपल्याला सर्वांचे भावना समजून घ्यावे लागतात आणि या सर्व गोष्टी करत असताना महिला म्हणून आपण आपल्यासाठी वेळ काढायला विसरू नका याच गोष्टीला अनुसरून लक्षात ठेवून सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी असा मानस केला होता की, आपण सर्व विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या प्रांगणावर जाऊन एक पूर्ण दिवस आपल्या स्वतःवर खर्च करूया त्यामध्ये मैदानावर विविध खेळ मनोरंजनात्मक खेळ, काही विशिष्ट उपक्रम ज्यात गीत, गझल, शायरी यांसारखे उपक्रम राबवून सर्व मैत्रिणी सोबत आनंदाने दिवस घालवाला. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मेहनत घेतली. या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव तसेच सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.संजय जाधव, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील हे उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना वर्षा जाधव यांनी, तणावमुक्त होऊन आपण हा दिवस आनंदाने घालवा आणि पुढील कामासाठी सज्ज व्हावे. असे विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रा. संजय जाधव यांनी आपल्या उद्बोधन मध्ये विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना केले की, विद्यार्थी कठीण परिश्रम अभ्यासासोबत अभ्यास पूरक उपक्रमात आनंदाने सहभागी व्हावे तसेच आपले आयुष्याचे ध्येय निश्चित करत ते प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे. असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायमा शहा, सूत्रसंचालन तरन्नुम खत्री तर आभार सानिया पठाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भारत चालसे व प्रा. डॉ. अनिल साळुंके तसेच प्रा. डॉ. प्रसन्ना डांगे, चेतन कुंभार, शोभा गुरव व जगदीश राठोड यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोलाचे सहकार्य लाभले.



