*गुरु रविदास सभा मंडपासाठी खा. अशोक चव्हाण यांना निधीची मागणी करु, नरसी येथे गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गुरु रविदास सभा मंडपासाठी खा. अशोक चव्हाण यांना निधीची मागणी करु, नरसी येथे गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी*
*गुरु रविदास सभा मंडपासाठी खा. अशोक चव्हाण यांना निधीची मागणी करु, नरसी येथे गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी*
नायगांव(प्रतिनिधी):-आपल्या गावातील चर्मकार समाज बांधवांच्या अथक परिश्रमातून येथे गुरु रविदास मंदिर प्रेरणा केंद्राची निर्मिती झाली आणि समोरील जागेत एक भव्य दिव्य असे सभा मंडपाचे बांधकाम देखील झाले पाहिजे यासाठी आपण महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण तसेच डॉ. अजित गोपछडे यांचा मोठा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करू असे मत भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे यांनी नरसी (ता नायगांव) येथे आयोजित राष्ट्रसंत गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती सोहळ्यात बोलताना व्यक्त केले. नरसी येथे आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास महाराज यांची 628 वी जयंती साजरी करण्यात आली असून या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नरसीचे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील भिलवंडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे, अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनीयर चंद्रप्रकाश देगलूरकर यांची प्रमुख उपस्थीती होती. त्याच बरोबर विचारमंचावर माजी जि. प. सदस्य माणिकराव लोहगावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे, प्राचार्य मनोहर तोटरे, पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल, बसपाचे सुधाकरराव सरोदे, माजी सरपंच व्यंकटराव कोकणे, राजेश भिलवंडे, साईनाथ अक्कमवाड, अलीम बेग पटेल, जेष्ठ पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर, गंगाधर भिलवंडे, गोविंद नरसीकर, प्रकाश हानमंते, माधवराव बैलकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना श्रावण पाटील भिलवंडे म्हणाले की केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करीत असताना सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका ठेवली आहे तळागाळातील जनता सामान्य नागरिक हे सरकारच्या सोबत आहेत येणाऱ्या काळात सर्वत्र निश्चितच विकासाची कामे होतील असा आशावाद व्यक्त केला आणि जयंती सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारणारे गुरु रविदास हे विद्रोही संत होते-इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, भारतातील विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारणारे गुरु रविदास हे विद्रोही संत होते असे प्रतिपादन अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले. आपल्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, भारतात कांही लोकांनी जाणीवपूर्वक माणसामाणसांत भेदभाव करणारी विषमतावादी व्यवस्था निर्माण केली होती. या व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह पुकारुन गुरु रविदासांनी समतेवर आधारित मानवतावादी विचारांची पेरणी केली. यासाठी त्यांना बलिदान द्यावे लागले याची जाण आजच्या पिढीतील नागरिकांनी ठेवली पाहिजे . या कार्यक्रमाचे प्रास्तावीक आणि सुत्रसंचलन मंडळाचे अध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव हाणमंत गंगासागरे, माधव गंगासागरे, सटवाजी बरबडे, गंगाधर मिस्त्री दुडकीकर, आनंदा बरबडे, रोहीदास गंगासागरे, शैलेश गंगासागरे, अशोक गंगासागरे, धोंडीबा कांबळे, सुरेश कांबळे, गजानन गंगासागरे, पांडू गंगासागरे, साईनाथ गंगासागरे आदींनी परीश्रम घेतले.



