*शहादा तालुक्यातील 48 गांवात विद्युत पुरवठा खंडित; बिरसा फायटर्सचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहादा तालुक्यातील 48 गांवात विद्युत पुरवठा खंडित; बिरसा फायटर्सचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन*
*शहादा तालुक्यातील 48 गांवात विद्युत पुरवठा खंडित; बिरसा फायटर्सचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन*
शहादा(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील मंदाणा गटातील 48 गांवात विद्युत पुरवठा खंडित राहत आहे, विद्यूत पुरवठा नियमितपणे सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभाग शहादा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहादा तालुक्यातील मंदाणा गटातील एकूण 48 गांवात गावठाण व शेत पंपाची वीज दिवसातून फक्त 3 ते 4 तास दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांना पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत असून, शेत पिकांचे नुकसान होत आहे.गावठाणातील वीज दिवसातून केव्हाही ये जा करते. त्यामुळे या भागातील गावांतील लोकांना रात्री अंधारात राहावे लागत आहे. वीज ये जा करत असल्यामुळे शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कारण इयत्ता 10 व 12 वीचे बोर्डचे परिक्षा सुरू आहेत. घरात लाईट नसल्यामुळे शाळकरी मुलांना रात्री अभ्यास करता येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या परिक्षेच्या निकालावर याचा मोठा परिणाम होऊन मोठे शैक्षणिक नुकसान होईल. म्हणून शहादा तालुक्यातील मंदाणा गटातील एकूण 48 गावांतील वीज पुरवठा खंडित न ठेवता नियमितपणे सुरळीत चालू ठेवावा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून विद्युत वितरण कंपनी मर्यादित विभाग शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे.



