*पंढरीनाथ बोकारे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’–पत्रकारितेतील कार्याची राज्य पातळीवर दखल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पंढरीनाथ बोकारे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’–पत्रकारितेतील कार्याची राज्य पातळीवर दखल*
*पंढरीनाथ बोकारे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’–पत्रकारितेतील कार्याची राज्य पातळीवर दखल*
नांदेड(प्रतिनिधी):-येथील ज्येष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांना वरोरा येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकारांच्या एकदिवसीय अधिवेशनात प्रतिष्ठेचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर असोसिएशन, महाराष्ट्र तर्फे देण्यात आला.
हा पुरस्कार वरोराच्या नगराध्यक्षा अर्चना ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आपल्या भाषणात त्यांनी बोकारे यांच्या पत्रकारितेतील सत्यनिष्ठ, निष्पक्ष आणि निःस्वार्थ योगदानाचे विशेष कौतुक करताना म्हटले की, “पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील घडामोडींचे निर्भीड आणि वस्तुनिष्ठ चित्रण करून आपण पत्रकारितेला नवे मूल्य आणि दिशा दिली आहे.आपल्या कार्यामुळे समाजात जागरूकता निर्माण झाली असून नव्या पिढीसाठी आपण प्रेरणास्थान आहात.”
अधिवेशनात बोलताना असोसिएशनचे प्रदेश सचिव आशिष घुमे यांनी नमूद केले की, पत्रकारितेसोबतच पंजाब आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये बंधुभाव जागृत करण्यासाठी नानक साई फाऊंडेशन प्रभावी भूमिका बजावत आहे. या सामाजिक चळवळीचे नेतृत्व करताना पंढरीनाथ बोकारे आणि त्यांच्या टीमने राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या अधिवेशनास असोसिएशनचे अध्यक्ष उत्तमराव वाडकर, सचिव ईश्वरसिंह सेंगर, कार्याध्यक्ष योगेश तुरेराव, राज्याध्यक्ष संतोष धरमकर, राज्य सचिव आशिष घूमे, मुकेश जिवतोडे, अतुल कोल्हे, भारती मुरकुटे, धनंजय उमरीकर, विश्वासराव अरोटे शिर्डी, जे.एच. पिन्नलवार, पुरुषोत्तम झाडे, अशोक सातपुते, पत्रकार भोयर, विजापूर एम.एस. मलाबवडी,गोपाळ कुलकर्णी, दाजी पाटील, बंडू मानकर यांसह राज्यभरातील पत्रकारांची उल्लेखनीय उपस्थिती होती.
दरम्यान, या यशाबद्दल चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी बोकारे यांचा विशेष सत्कार केला. या वेळी बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बोकारे यांचा हा ‘जीवन गौरव पुरस्कार’ केवळ वैयक्तिक सन्मान नसून, ग्रामीण आणि प्रादेशिक पत्रकारितेच्या ओळखीचा एक मानबिंदू ठरला आहे. नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असून, पंढरीनाथ बोकारे यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे असे मत नानक साई फाऊंडेशनचे उपाध्यक्ष जे.एच. पिन्नलवार यांनी व्यक्त केले.



