*चांदसैली घाटात पिकअप वाहनाला भिषण अपघात होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू व 5 जण जखमी प्रकरणी मुख्यमंत्री सहायता निधीतून 32लक्षरुपयांचा निधी मंजूर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चांदसैली घाटात पिकअप वाहनाला भिषण अपघात होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू व 5 जण जखमी प्रकरणी मुख्यमंत्री सहायता निधीतून 32लक्षरुपयांचा निधी मंजूर*
*चांदसैली घाटात पिकअप वाहनाला भिषण अपघात होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू व 5 जण जखमी प्रकरणी मुख्यमंत्री सहायता निधीतून 32लक्षरुपयांचा निधी मंजूर*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव तालुक्यातील चांदसैली घाटात पिकअप वाहनाला भिषण अपघात होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता, त्यात राहुल मिस्तरी, चेतन पाटील, रामेश्वर धनगर व भुषण गोसावी यांना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेतंर्गत प्रत्येकी 2 लाख रुपये मंजूर झाले असून, तर मुख्यमंत्री यांनी मयतांच्या वारसांस प्रत्येकी 3 लक्ष रुपये, तसेच मयत पवन मिस्तरी, योगेश भिल, हिरालाल भिल व गणेश भिल यांच्या वारसांस कोणत्याही योजनांमधून अर्थसहाय्य मिळाले नसल्याने मुख्यमंत्री यांनी मानवतावादी दृष्टीकोनातून प्रत्येकी पाच लक्ष रुपये याप्रमाणे एकूण 32 लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर करण्यात आले आहे, सदर मंजूर अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या असलेल्या मुंबई शाखेतून आपल्या नावे, स्टेट बँक ऑफ इंडिया, नंदुरबार, मुख्य शाखा, बैंक खाते क्र. ११३८६०९१४४२ मध्ये परस्पर वर्ग करण्यात आले आहेत. पाठविलेल्या अहवालानुसार मृत व्यक्तींच्या कायदेशीर वारसांस आवश्यक ती संपूर्ण पडताळणी करुन अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे. तसेच अर्थसहाय्य मंजूर प्रयोजनाकरीता वापरण्यात आल्याबद्दल विनियोगाचे प्रमाणपत्र सादर करण्यात यावे, मृतांच्या कायदेशीर वारसांस अर्थसहाय्य प्राप्त झाल्याबद्दल महसूल मुद्रांकित पावती या सचिवालयास सत्वर पाठवावी, निधीच्या रक्कमेचा विनियोग न झाल्यास सदर रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या बँक खाते क्र. १०९७२४३३७५१ स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मुंबई, मुख्य शाखा, या खात्यात तात्काळ वर्ग करुन या सचिवालयास तसे अवगत करावे.



