*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
*विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष लोककवी लोकनाथ यशवंत यांचा नंदुरबार सत्कार संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नांदेड येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्यच्या वतीने 20 वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लोककवी लोकनाथ यशवंत यांची निवड करण्यात. संमेलनाध्यक्ष लोकनाथ यशवंत यांचा आज नंदुरबार मध्ये जेष्ठ कवी लेखक दीनानाथ मनोहर व सत्कार समारंभाचे अध्यक्ष कॉम्रेड आर. टी गावीत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विचार मंचावर प्रमुख वक्ते मुबंईचे प्रा. अनिल सपकाळ सत्यशोधक चे जेष्ठ नेते कॉ. रामसिंग गावीत com. करणसिंगकोकणी com. शीतल गावीत, com
गेवाबाई गावीत आदी मान्यवर उपस्थित होते.
पंचायत समितिच्या चसभागृहात या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. अनिल सपकाळ यांनी विद्रोही चळवळ व लोकनाथ यशवंत यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे जुलमी, अन्यायी, अत्याचारी आणि विषमते विरुद्ध उठवलेला आवाज होय. लोकनाथ यशवंत यांनीही आपल्या विविध कविता संग्रहातील कवितेतून दलित, पीडित आणि शोषितांच्या वेदना मांडून बहुतांच्या वास्तवाच्या अत्यंत भेदक चित्रण केले आहे. कवितेतील पारदर्शक शब्दातून मानवी जीवनाचे वास्तव मांडून आंबेडकरी चळवळीतील दिखाऊपणा, ढोंगीपणा, स्वार्थांधता यावरही लोकनाथ यशवंत यांनी कडाडून हल्ला चढविला आहे. लोकनाथ यशवंत यांची कविता ही माणसांचे गीत गाते. मानवतेसाठी विषमतेवर हल्ला चढवते. यावेळी सत्काराला उत्तर देताना लोककवी लोकनाथ यशवंत म्हणाले की, खरे तर मला संमेलनाचा अध्यक्ष करून या ठिकाणी सत्कार होतो आहे त्यामुळे मी अतिशय भारावून गेलो आहे. उपस्थित असणाऱ्या स्त्रियांमध्ये मला माझी आई दिसते आहे. खरे तर आज मला माझ्या कवितेने फार मोठा सन्मान मिळवून दिला आहे. मला जे डोळ्याने दिसते तेच मी माझ्या कागदावर उतरवतो आहे. प्रवास करताना, इकडे तिकडे फिरताना मी माणसांचे जगणे, वागणे, बोलणे, चालणे आणि फिरणे बारकाईने न्याहाळतो व त्यातूनच माझी कविता जन्माला येते. माझे वडील माझ्या कविता खिशात ठेवायचे व कुणालाही वाचून दाखवायचे. त्यामुळे त्यांचेही बळ माझ्या पाठीशी खूप होते. अध्यक्षीय समारोप करताना कॉम्रेड आर. टी. गावीत यांनी मा. अध्यक्षाची कविता {बेल,} वाचून दाखवत स्टेनसने आपल्या डोळ्या देखत खेळत असलेल्या मुलांना जाळणाऱ्या मनुला माफ केलं चे वाचन करुंन आज मनुवाद किती जोराने फोफावत आहे त्यावर भाष्य केले आज संमेलनाची गरज का असते हे सांगितले. त्याचबरोबर आपण जे जगतो, भोगतो आणि सोसतो ते साहित्यात मांडले जाते. पूर्वी आपल्या जीवनाचा विषय साहित्यात येत नव्हता. महात्मा फुलेंनी संमेलनास पत्र लिहून आपली भूमिका कळवली होती. व त्यांच्या साहित्य संमेलनास जाण्यास नकार दिला होता. ही व्यवस्था जुलमी आहे. माणसांचे माणूसपण हिरावून घेणारी आहे. त्यासाठी साहित्य निर्माण होणे व साहित्य संमेलने घेणे ही काळाची गरज आहे. लोकनाथ यशवंत यांच्या साहित्यानेही समाजातील वाईट प्रवृत्तीवर प्रहार केला आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित गावीत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गावीत व आभार करणसिंग कोकणी यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात शेतीचा शोध लावणारी आई देवमोगरा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून फुले रचित सत्याचा अखंड गायन करून करण्यात आला. कार्यक्रमाला सत्यशोधक चळवळीतील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



