*राजापूरातील कोळंब शाळेत नवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वह्या वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूरातील कोळंब शाळेत नवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वह्या वाटप*
*राजापूरातील कोळंब शाळेत नवनाथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वह्या वाटप*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोळंब येथे नवनाथ वैद्यकीय शैक्षणिक चारिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्यामार्फत श्रीम.सुमिक्षा धोपावकर यांच्या हस्ते मोफत वह्या वाटप करण्यात आले यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी किसन नारायण पाटेकर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रम प्रसंगी बोलताना श्रीम. धोपावकर यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी संस्था प्राधान्यांना काम करत असल्याचे सांगितले तसेच मुलांनी आपले ध्येय ठरवून त्यासाठी परिश्रम करण्याचे आवाहन यांनी केले. वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी श्रीम.धोपावकर, किसन पाटेकर, नारायण पाटेकर, राधा पाटेकर समीक्षा पाटेकर, सत्यवान पाटेकर, विश्वनाथ पाटेकर तसेच शाळेचे शिक्षक वृंद
जयेश तेलंग, जयवंत पवार विजयकुमार माने, प्रणाली मोरे आणि विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेच्या या शैक्षणिक कार्याबद्दल परिसरात कौतुक केले जात आहे.



