*फणसाचे तळलेले गरांचा शोध लावणाऱ्या भू गावातील शरद पाध्ये यांच्या जिद्दीला सलाम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*फणसाचे तळलेले गरांचा शोध लावणाऱ्या भू गावातील शरद पाध्ये यांच्या जिद्दीला सलाम*
*फणसाचे तळलेले गरांचा शोध लावणाऱ्या भू गावातील शरद पाध्ये यांच्या जिद्दीला सलाम*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील भू चिंचपेठ येथील रहिवासी आणि लघु उद्योजक शरद पाध्ये यांनी सुमारे 50 वर्षांपूर्वी फणसाच्या गऱ्यापासून चिप्स बनवण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला आणि आज हे नाव जरी कुणाला माहीत नसले तरी त्यांनी आपल्या मेहनत व कष्टाने उभारलेला हा व्यवसाय सर्वदूर पसरला आहे. त्यांनी व्यवसायाचा पूर्ण इतिहास उलगडला ते म्हणाले आमचा स्वतःचे छोटेसे हॉटेल आणि पालेभाजीचा व्यवसाय आहे. त्याचबरोबर पूर्ण भारतातील फळांचा राजा म्हणजे कोकणातील शान हापूस आंबाचा छोटा व्यवसाय सुद्धा करतो. वडिलोपार्जित जागा आणि आंबा काजूंची लागवड त्यातून उप्तन्न होईल आणि घरातील सोयी निर्माण करता येईल. माझे वडील शरद पाध्ये म्हणजे भू पंचक्रोशीत आप्पा पाध्ये या नावाने ओळखले जातात. पुढे आंबा काजू बरोबर फणसाचा सुद्धा व्यवसाय चालू केला, फणसामधून आपण चांगले उत्पन्न घेऊन शकतो. माझ्या वडिलांनी 50 वर्षा पूर्वी फणसापासून चिप्स बनवले. फणसाचे चिप्स तयार केले पण मार्केट माहिती नव्हते कुठे विकायचे पण मेहनत घेतल्यामुळे आजूबाजूच्या गावातील मंडळींनी फणसाचे चिप्स विकत घेतले आणि गावातील मंडळींना आवडले सुद्धा, चांगला प्रतिसाथ सुद्धा मिळाला. फणसाचे चिप्स तळलेले गरे यांचा शोध माझ्या वडिलांनी शरद पाध्ये यांनी लावला. आंबा काजूला चांगला भाव मिळायचा पण फणस जास्त प्रमाणात कोकणात असून ते फक्त वटपौर्णिमेला मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. गावा गावात फणस इतके होते कि खाणारे कमी पण फणस त्याहून जास्त हे फणस खाली पडून फुकट जायचे 50 वर्षा पूर्वी फणसाला 1 रुपया सुद्धा नीट मिळत नव्हता, फणसामधून गरे, अटूळ मिळतात पण ते फुकट जायचे. फणस दोन प्रकारचे कापा आणि बरका. कापा फणस खायला मस्त आणि चवीला 1 नंबर.
कोकणात जास्त फणसाची झाड होती. एप्रिल पासून फणस तयार व्हायचा पण पावसाच्या वेळी फणस खाली पडून वास यायचा, अटूळचा वापर सुद्धा केला जात नसायचा. आमचा पहिला फणसाचा व्यवसाय म्हणजे फणस पोळी होता, एके दिवशी वडिलांनी विचार केला कि फणसापासून तळलेले गरे बनवूया आणि विकूया, त्या वेळी परिस्थिती खूप बिकट होती, व्यवसाय करायची खूप आवड होती, जिद्द ठेऊन फणसाचे गरे बनवले आणि हळू हळू फणसाचे गरे विकले गेले, कारण गावो गावी ग्रामस्थ खूप होते, शेती करायचे पण आता गावात काही हाताची बोटे मोजण्या इतकी मंडळी राहिले आहेत. पूर्वी सर्व कामांसाठी माणसं जास्त प्रमाणात मिळत होती. पण आता प्रत्येक गावात कामगार मिळत नाहीत सुरुवातील फणसाचे गरे पावकिलो, 100 ग्राम असे दुकानात आणि मुंबईला विकायला दिले. विकण्यासाठी मालाचा एक ही रुपया पहिला घेतला नाही पण जिद्द सोडली नाही. विकले तर पैसे द्या असे प्रत्येक माल विक्री करणाऱ्या दुकानदाराला सांगायचे. हळू हळू लोकांची मागणी येऊ लागली मुंबई मध्ये पावकिलो 100 ग्राम पॅकेटचे ऑर्डर येऊ लागले. 1-2 वर्ष उलटून गेले परिस्थिती सुधारु लागली आणि गावात सुद्धा आजूबाजूचे मंडळी, नातेवाईक सुद्धा बघून फणसाचे तळलेले गरे तळून विकायला लागले, ते बघून माझ्या वडिलांना आनंद मिळाला, ज्या साठी हट्ट केला तो बरोबर होता जेणे करून गावातील मंडळींना रोजगार मिळाला.
50 वर्ष कधी आणि कशी गेली कळलीच नाही. आमच्या वडिलांनी आता पर्यंत खूप मेहनत घेतली, आता आम्ही हा व्यवसाय चालवतो. म्हणजे तरुण पिढीकडे हा व्यवसाय आला पण सगळी मेहनत आमच्या वडिलांनी घेतली. मंदार व मकरंद आम्ही दोघे पण हा वारसा चालवत आहोत तसेच आमच्या सहचारिणींची पण उत्तम साथ लाभत आहे. आजूबाजूच्या गावातील मंडळी फणसाचे चिरलेले गरे आम्हाला आणून देतात ते गरे आम्ही किलोच्या भावाने घेतो जेणे करून दोघांना फायदा होईल आमचा वेळ सुद्धा वाचेल आणि गावातील मंडळींना चांगले उप्तन्न सुद्धा मिळेल. पूर्वी मनुष्यबळ खूप चांगले होते तेव्हा आम्ही अख्खा फणस घेत असे त्यातून चांगले उत्पन्न येत होते हळू हळू सर्वच गावातील मनुष्यबळ कमी होत गेले पण काम जास्त प्रमाणात वाढत गेले, तेव्हा विचार केला फणसाचे चिरलेले गरे दिले तर त्यांना चांगले पैसे मिळतील आणि आमचा वेळ सुद्धा वाचेल त्या वेळात जास्त प्रमाणात फणसाचे तळलेले गरे तयार होतील. झाडावर चढणारी माणसं सुद्धा कमी झाली. आम्ही जी सवय गावातील मंडळींना लावली आहे ती सवय त्यांना खूप आवडायला लागली आणि दुसऱ्या भागातून सुद्धा फणसाचे गरे येऊ लागले. स्वतः मेहनत करून शेतकरी मंडळींना पैसे मिळायला लागले. मुंबई आणि पुण्यात सुद्धा जास्त प्रणाम गरे जाऊ लागले, आता गरे 3-4 टन इतके जाऊ लागले. ज्यांना हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कमीत कमी 4-5 टनातून चांगले उत्पन्न घेऊ शकता.
फणसाचे गरे हे खोबरेल तेलात बनवायला लागतात, आणि आता खोबरेल तेलाची किंमत सुद्धा वाढली आहे.
खोबरेल तेलात तळल्यामुळे 6-7 महिने सुद्धा खराब होत नाही, खायला सुद्धा कुरकुरीत लागतात असे मकरंद पाध्ये यांनी सांगितले. सर्वांनी शरद पाध्ये यांच्या प्रमाणे चिकाटीने व्यवसाय केला कि आपला कोंकण खूप पुढे जाईल आणि आपल्या कोकणच नाव नक्कीच मोठं होईल. शरद पाध्ये यांची जिद्द नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. अधिक माहिती हवी असल्यास ९२७२४५२२५२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा श्री मकरंद शरद पाध्ये यांनी आवाहन केले आहे.



