*गणित प्राविण्य परीक्षेत एकलव्य विद्यालय पुन्हा ठरले जिल्ह्यात अव्वल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गणित प्राविण्य परीक्षेत एकलव्य विद्यालय पुन्हा ठरले जिल्ह्यात अव्वल*
*गणित प्राविण्य परीक्षेत एकलव्य विद्यालय पुन्हा ठरले जिल्ह्यात अव्वल*
नंदूरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ आयोजित गणित स्पर्धा परीक्षेत एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असून विद्यालय पुन्हा जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. इयत्ता पाचवीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी एकलव्य विद्यालयाचे उत्तीर्ण झाले असून ते राज्यस्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत. इयत्ता पाचवीतून आरव गौरीशंकर धुमाळ, जिया फातेमा अन्सार शेख, यशोदीप मच्छिंद्र पाटील, आरुष संजय बैरागी, हर्षदा सुनील सूर्यवंशी, सार्थकी गणेश सांगळे, जिग्नेश संतोष एकलारे, गुंजन रवींद्र राजपूत, जान्हवी विशाल बारी, दिवेश प्रेमचंद पाटील व स्वरांगी यशवंत कोकणे या विद्यार्थ्यांनी यश मिळविले तर इयत्ता आठवीतून हर्षल अमरसिंग पवार, आदर्श राहुल पाटील, मयंक दिनेश जाधव, साई सुनील माळी, जिग्नेश भानुदास भामरे व देवांशू नितीनकुमार देसले या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. वरील सर्व विद्यार्थी राज्यस्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा आज विद्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे गणित विभाग प्रमुख धर्मेंद्र मराठे, शाळेचे गणित विभाग प्रमुख कल्पेश तांबोळी, विज्ञान विभाग प्रमुख मिलिंद वडनगर, ज्येष्ठ शिक्षक टीका पाडवी, जयश्री खैरनार, राजेश वळवी, नितीन पाटील, सुयोग शिंपी, राहुल भावसार, सुवर्णा गिरासे, संदीप पाटील, सुदर्शन चोळके, राकेश बागुल, प्रदीप वाघ व विशाल पाटील उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातील गणित शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
नियोजनबद्ध अध्यापन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच एकलव्य विद्यालयाने जिल्ह्यात आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली आहे. या यशामागे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावकर माजी प्राचार्य सुहासिनी नटावदकर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी यांचे मार्गदर्शन व प्रेरणा महत्त्वपूर्ण आहे.



