*मोलगी अप्पर तहसील कार्यालयाचा अप्पर तहसीलदार पदाचा कार्यभार नितीन पाटील यांनी स्वीकारताच महसुली अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मोलगी अप्पर तहसील कार्यालयाचा अप्पर तहसीलदार पदाचा कार्यभार नितीन पाटील यांनी स्वीकारताच महसुली अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली*
*मोलगी अप्पर तहसील कार्यालयाचा अप्पर तहसीलदार पदाचा कार्यभार नितीन पाटील यांनी स्वीकारताच महसुली अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण झाल्यापासून रिक्त असलेल्या अपर तहसीलदार पदाचा कार्यभार रिक्त होता, 16 फेब्रुवारी रोजी मोलगी अप्पर तहसील कार्यालयाचे अप्पर तहसीलदार म्हणून नितीन पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्यांनी तात्काळ 16 फेब्रुवारीपासून अप्पर तहसील कार्यालयाचा कार्यभार सांभाळल्याने नर्मदा काठावरील व परिसरातील अतिदुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी मोलगी, डाब व वडफळी मंडळ अधिकारी तसेच ग्राम महसूल अधिकारी व कोतवाल यांची संयुक्त बैठक घेऊन महसुली कामकाजाचा आढावा घेतला.
मोलगी येथे अप्पर तहसीलदार पद अनेक महिन्यांपासून रिक्त असल्यामुळे स्थानिक नागरिकांना सातबारा उतारे, वारस नोंद, जमीन नोंदी, प्रमाणपत्रे, जमीन मोजणी आदी विविध महसुली कामांसाठी अक्कलकुवा येथे जावे लागत होते. नर्मदा काठावरील डोंगराळ व अतिदुर्गम भागातून प्रवास करणे वेळखाऊ व खर्चिक ठरत असल्याने नागरिकांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. अनेक वेळा एका कागदपत्रासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागत असल्याने नाराजी वाढत होती व काही महसुली प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाणही वाढले होते. मात्र आता मोलगी येथे अपर तहसीलदारांची नियुक्ती झाल्याने महसुली सेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार असून प्रलंबित प्रकरणे जलद मार्गी लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शासनाच्या विविध योजना व महसुली सेवा दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत अधिक सुलभपणे पोहोचतील, असा विश्वास स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नव्या नियुक्तीमुळे स्थानिक प्रशासन अधिक प्रभावी होऊन विकासकामांना चालना मिळेल तसेच नागरिक व प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. नितीन पाटील यांनीही अधिकाऱ्यांना नागरिकाभिमुख व वेळेवर महसुली सेवा देण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळाली आहे.



