*महाशिवरात्री निमित्त रुद्राक्ष व महाप्रसाद वाटप,1 हजार भाविकांना लाभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाशिवरात्री निमित्त रुद्राक्ष व महाप्रसाद वाटप,1 हजार भाविकांना लाभ*
*महाशिवरात्री निमित्त रुद्राक्ष व महाप्रसाद वाटप,1 हजार भाविकांना लाभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त शहरात भक्तिमय वातावरणात रुद्राक्ष व महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 1 हजार रुद्राक्षांचे भाविकांना वाटप करण्यात आले.
नंदुरबार येथील लक्ष्मी नगर भागात महाशिवरात्री निमित्त रुद्राक्ष वाटप व महाप्रसाद वाटप करण्यात आला नंदुरबार नगरपालिकेचे नगरसेवक किरण रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी व भूषण नेरे यांच्या हस्ते रुद्राक्ष वाटप व महाप्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान शंकराची महाआरती करण्यात आली या नंतर उपस्थित भाविकांना रुद्राक्ष देण्यात आले. रुद्राक्ष हे भगवान शंकराचे प्रतीक मानले जात असल्याने भाविकांनी मोठ्या श्रद्धेने त्याचा स्वीकार केला.
यावेळी महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक व शिवभक्त उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन हिरामण पाटील, व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. महाशिवरात्री निमित्त आयोजित या उपक्रमामुळे परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



