*नंदुरबार तालुक्यातील नळवे खुर्द येथे महाशिवरात्रीनिमित्त शिव मंदिर जीर्णोद्धार व मुकुट अर्पण कार्यक्रम निमित्त शोभायात्रा व महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुक्यातील नळवे खुर्द येथे महाशिवरात्रीनिमित्त शिव मंदिर जीर्णोद्धार व मुकुट अर्पण कार्यक्रम निमित्त शोभायात्रा व महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*नंदुरबार तालुक्यातील नळवे खुर्द येथे महाशिवरात्रीनिमित्त शिव मंदिर जीर्णोद्धार व मुकुट अर्पण कार्यक्रम निमित्त शोभायात्रा व महाप्रसाद कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-उज्जैनच्या महाकाल नगरीतून आणलेला मुकुट जिर्णोद्धार प्रसंगी केला अर्पण,
येथील पाताळगंगा नदी काठावर असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीचे अवचित साधून येथील सेवेकरी असलेल्या भाविक सुनंदा नाईक यांनी शिव मंदिर जिर्णोद्धार निमित्त मुकुट अर्पण केला होता, त्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली या ठिकाणी शोभायात्रेत गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. संपूर्ण गावातून शोभायात्रा काढून मंदिरावर समारोप करण्यात आला. विधिवत पूजा करून महाआरती करण्यात आली.
दिनांक 15 व 16 फेब्रुवारी या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या सोमवारी महाप्रसाद भंडारा वाटप करून समारोप करण्यात आला. यावेळी मसालेभात व बुंदी पुरी भाजी हा बटाट्याची भाजीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
यापूर्वी मंदिर परिसर काटेरी व झुडपे वाढले होते त्याच्या श्रमदानातून सुनंदा नाईक यांच्या पुढाकाराने सर्व युवक युवती व ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबविले व परिसर स्वच्छ केला. या कार्यक्रमासाठी धीरू नाईक, कमलेश नाईक, तेजस नाईक, नंदनी वळवी, मुन्ना नाईक, सतीश नाईक यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.