*माणगाव येथील सरस्वती विद्या मंदिर, वडघर मुद्रे येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माणगाव येथील सरस्वती विद्या मंदिर, वडघर मुद्रे येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर*
*माणगाव येथील सरस्वती विद्या मंदिर, वडघर मुद्रे येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर*
रायगड(प्रतिनिधी):-माणगाव तालुक्यातील सरस्वती विद्या मंदिर येथे निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोकणचे भूमिपुत्र, तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, सत्यवान रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर मुंबई, भारत सरकार यांची उपस्थिती लाभली.
शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. केंद्र शासनाच्या परीक्षांमध्ये UPSC (IAS, IPS, IFS, NDA, CDS, CAPF), SSC (CGL, CHSL, MTS, GD), बँकिंग (IBPS, SBI), रेल्वे (RRB NTPC, Group D, JE) तसेच संरक्षण दलांच्या भरती प्रक्रियेची माहिती देण्यात आली तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या MPSC राज्यसेवा, गट ब व क, वन व अभियांत्रिकी सेवा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, पंचायत विभाग आणि शिक्षक भरती (TET, CTET) याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध संधींबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. 10 वी, 12 वी व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध स्पर्धा परीक्षांचे पर्याय स्पष्ट करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास शाळेचे वरिष्ठ शिक्षक सुरेश भेदाटे, पाटील, गुजर, ऐत उपस्थित होते. तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष धनवेश साळवी व सदस्य रुपेश दर्गे यांनीही उपस्थिती दर्शविली. उपस्थित आजी- माजी विद्यार्थ्यांचे आयोजकांनी आभार मानले.



