*महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर फुफेरे भोवडवाडीतील सभा मंडपाचे आमदार किरणजी सामंत यांच्या हस्ते उद्घाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर फुफेरे भोवडवाडीतील सभा मंडपाचे आमदार किरणजी सामंत यांच्या हस्ते उद्घाटन*
*महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर फुफेरे भोवडवाडीतील सभा मंडपाचे आमदार किरणजी सामंत यांच्या हस्ते उद्घाटन*
ओणी(प्रतिनिधी):-राजापूर-लांजा-साखरपा मतदार संघात किरण सामंत यांनी फुफेरे भोवडवाडी येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करत महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर नव्याने उभारण्यात आलेल्या सभा मंडपाचे उद्घाटन केले. ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीनुसार सभा, धार्मिक कार्यक्रम व विविध सामाजिक उपक्रमांसाठी आवश्यक असलेला हा मंडप प्रत्यक्षात साकार झाला असून, यामुळे भोवडवाडीतील सार्वजनिक कार्यक्रमांना कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होणार आहे.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत "जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणे ही माझी जबाबदारी आहे. विकासकामे वेळेत पूर्ण करून परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाईल,"असा विश्वास व्यक्त केला.
उद्घाटन प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाशिवरात्रीच्या दिवशीच हे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व आनंद व्यक्त केला.