*आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला नाला येथील हनुमान मंदिरात सुंदरकांड पठण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला नाला येथील हनुमान मंदिरात सुंदरकांड पठण*
*आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला नाला येथील हनुमान मंदिरात सुंदरकांड पठण*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला नाला येथील हनुमान मंदिरात सुंदरकांड पठण करण्यात येऊन प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी परमेश्वराला साकडे घालण्यात आले सुंदर कांडचे पठण समाज सुधारक तथा कीर्तनकार प्रताप वसावे यांनी आपल्या भजन मंडळाद्वारे केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, करणसिंग पाडवी, जयमलसिंग पाडवी, भूपेंद्र पाडवी, किसन नाईक, जगदीश वळवी, सुनील राव, अमृत चौधरी, अशोक राऊत, महेश तवर, भूषण पाडवी, वीरबहादूरसिंह राणा, उमेश पाडवी आदि प्रमुख उपस्थितीत होते.
माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना उदंड आयुष्य लाभण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील नाला येथील श्री हनुमान मंदिरात सुंदरकांडचे पठण करण्यात आले यावेळी माजी मंत्री डॉ. गावित यांच्या उदंड आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी साकडे घालण्यात आले यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते.