*तलावडी येथील अंगणवाडी सेविका नजा पावरा या कायमस्वरूपी अंगणवाडी सेविका म्हणून कामावर राहणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तलावडी येथील अंगणवाडी सेविका नजा पावरा या कायमस्वरूपी अंगणवाडी सेविका म्हणून कामावर राहणार*
*तलावडी येथील अंगणवाडी सेविका नजा पावरा या कायमस्वरूपी अंगणवाडी सेविका म्हणून कामावर राहणार*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावद प्रकल्पातील तलावडी या गावातील अंगणवाडी सेविका नजा पावरा यांना अंगणवाडी केंद्रावर आधारित आठ महिन्याचा कालावधी लोटला होता. मात्र त्या गावातील काही लोकांनी नासिक विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीच्या आधारे नाशिक विभागीय आयुक्त यांनी नजा पावरा या सेविकेला सेवेतून कमी करण्याची ऑर्डर काढली होती, त्या ऑर्डरच्या विरुद्ध आपण औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली, त्या याचिकेवर हायकोर्टात कामकाज झाले, विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिलेल्या आदेशाला हायकोर्टाने स्थगिती दिली, त्यामुळे तलावडी येथील अंगणवाडी सेविका नजा पावरा या कायमस्वरूपी अंगणवाडी सेविका म्हणून कामावर राहणार आहेत, त्यामुळे कमी केलेल्या सेविकेला व तिच्या कुटुंबाला मोठा आधार मिळालेला आहे, सदर कोर्टाच्या केसेस मध्ये संघटनेचे युवराज बैसाने कार्याध्यक्ष यांनी मोठी मदत केली तरी सर्व अंगणवाडी कर्मचारी यांचे आम्ही अभिनंदन व कौतुक केले आहे.



