*कोळवणखडी येथे मोफत बांबू प्रशिक्षण कार्यक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोळवणखडी येथे मोफत बांबू प्रशिक्षण कार्यक्रम*
*कोळवणखडी येथे मोफत बांबू प्रशिक्षण कार्यक्रम*
राजापूर(प्रतिनिधी):-राजापूर तालुका बांबू उत्पादक शेतकरी ग्रुप व महाराष्ट्र प्रमोशन फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत कोळवणखडी शाळा नं 1 येथे प्रगत बांबू लागवड आणि नर्सरी व्यवस्थापन यावर विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे या प्रशिक्षणात बांबू रोपांची योग्य कलर कोडिंग (गुणवत्तेनुसार वर्गवारी) आणि आधुनिक नर्सरी व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणात बांबू प्रजातींची निवड आणि लागवड, नर्सरीमध्ये रोप निर्मिती आणि संगोपन, कलर कोडिंगद्वारे रोपांची गुणवत्ता वर्गवारी, बांबू मार्केटिंग आणि नफा आदी विषयांवर प्रशांत आत्माराम दाते नाशिक (लिमका बुक आणि इंडियन बुक रेकॉर्ड ने सन्मानित) आणि पाटलोबा पाटील (PPBRF) कोल्हापूर हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी आपली नावे 14 फेब्रुवारी पूर्वी नोंदवावीत अधिक माहितीसाठी सुहास शिवराम मोरे - 9145168485, वासुदेव घाग - 8459437499, संदीप सरखोत - 9373643719, प्रतिक लाड - 7499402275 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन राजापूर तालुका बांबू उत्पादक शेतकरी यांनी केले आहे.



