*बामखेडे येथे प्राध्यापकांचे प्रशिक्षण शिबीराची सुरुवात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडे येथे प्राध्यापकांचे प्रशिक्षण शिबीराची सुरुवात*
*बामखेडे येथे प्राध्यापकांचे प्रशिक्षण शिबीराची सुरुवात*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे त. त., ता. शहादा, जि. नंदुरबार आणि महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी (MSFDA), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक आठवड्याच्या व्यक्तिमत्वं विकास प्रशिक्षण कार्यक्रमाला (FDP) उत्साहात प्रारंभ झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. एन डी पाटील पुणे, यांच्या शुभहस्ते पार पडले. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी, शिक्षणक्षेत्रात सतत बदलत असून शिक्षकांनी भारतीय ज्ञान परंपरांचा अभ्यास सतत करत राहणे काळाची गरज आहे. अशा प्रशिक्षणांमुळे अध्यापक अधिक प्रभावी व कालसुसंगत होतो, असे मत त्यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमाची भूमिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी मांडली. त्यांनी या उपक्रमातून प्राध्यापकांमध्ये अध्यापन कौशल्यांचा विकास होण्यासाठी सतत प्रशिक्षणाची गरज व उद्देश स्पष्ट केला.
या प्रसंगी प्रशिक्षक प्रा सचिन लडोर व प्रा संदीप पंकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा डाॅ बी एन गिरासे यांनी केले परिचय प्राडाॅ सी एस करंके यांनी व आभारप्रदर्शन समन्वयक प्रा. डॉ. योगेश पाटील यांनी मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयांतून सहभागी झालेले प्राध्यापक उपस्थित होते.



