*कॅनडाच्या शिष्टमंडळाचे नांदेडमध्ये स्वागत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कॅनडाच्या शिष्टमंडळाचे नांदेडमध्ये स्वागत*
*कॅनडाच्या शिष्टमंडळाचे नांदेडमध्ये स्वागत*
नांदेड(प्रतिनिधी):-कॅनडा सरकारचे कॅबिनेट मंत्री सरदार सिद्धू यांचे वडील नरेंद्र सिंग सिद्धू, कॅनडास्थित भारतीय उद्योगपती सरदार बंतसिंग नेझर, सरदार जगजित सिंग गवद्दी आणि पंजाब काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सरदार परमजीत सिंग गवद्दी हे जगप्रसिद्ध गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी नांदेडमध्ये आले आहेत. नानक साई फाउंडेशनच्या वतीने आज फाऊंडेशनचे सहसचिव श्रेयसकुमार पंढरीनाथ बोकारे यांनी हजूर साहिब रेल्वे स्थानकावर त्यांचे स्वागत केले.
शीख धर्माचे दहावे गुरू श्री गुरु गोविंदसिंग जी महाराज यांच्या पावन झालेल्या नांदेड शहराला भेट देणे हा एक चांगला भाग्ययोग आहे. पंजाब काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सरदार परमजीत सिंग गवड्डी (पंजाब) यांनी नांदेड येथे भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, तख्त सचखंड श्री हजूर साहिब (नांदेड) येथे दर्शन घेतल्यावर एका महान तीर्थयात्रेचा आध्यात्मिक अनुभव मिळतो. त्यांनी गुरुद्वारा मध्ये श्रद्धेने डोके टेकवले. दर्शनानंतर बोलताना ते म्हणाले, "दसवे गुरु श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने लाभलेल्या या नांदेड शहरात आल्यावर मला मनःशांती आणि समाधान लाभते. हजूर साहिबचे दर्शन हा केवळ धार्मिकच नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव आहे." कॅनडाचे शिष्टमंडळ लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा नरेंद्र सिंघजी आणि संत बाबा बलविंदर सिंघ जी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतील. चार दिवसीय हजूर साहिब यात्रेदरम्यान, भक्त नामदेव महाराज जी यांचे जन्मस्थान नानक झीरा येथे भेट दिली जाईल. दरम्यान, नानक साई फाउंडेशन, मंडळातर्फे आयोजित कॅनडा येथील प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे. नानक साई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांनी माहिती दिली.



