*जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे दंत तपासणी शिबिर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे दंत तपासणी शिबिर*
*जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे दंत तपासणी शिबिर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील बालवीर चौक परिसरात शहिद शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे आयोजित या उपक्रमास प्रसिद्ध दंत सर्जन डॉ. यश अग्रवाल व डॉ. पूजा अग्रवाल या दाम्पत्यांनी शालेय विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची दंत तपासणी केली. सुमारे दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. मौखिक आरोग्याबाबत डॉ. यश अग्रवाल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा मानस मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी व्यक्त केला. शिबिर यशस्वीतेसाठी संभाजी हिरणवाळे, जी. एस. गवळी यांनी सहकार्य केले.