*शहादा ते खेतिया मार्गावरील लोणखेडा चौफूली, कालेज, सुतगिरणी फाटा येथे गतिरोधक बसविण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहादा ते खेतिया मार्गावरील लोणखेडा चौफूली, कालेज, सुतगिरणी फाटा येथे गतिरोधक बसविण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
*शहादा ते खेतिया मार्गावरील लोणखेडा चौफूली, कालेज, सुतगिरणी फाटा येथे गतिरोधक बसविण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
शहादा(प्रतिनिधी):-शहादा ते खेतिया या मुख्य मार्गावर लोणखेडा चौफूली, सुतगिरणी फाटा, कालेज इत्यादी ठिकाणी गतिरोधक बसवा, अशी मागणी बिरसा फायटर्स़ संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहादा ते खेतिया या मुख्य मार्गावर लोणखेडा चौफूली, सुत गिरणी फाटा, पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय (लोणखेडा) शहादा येथे वाहनांची वर्दळ असते. कालेजची विद्यार्थी व प्रवाशी पायी प्रवास करुन रस्ता ओलांडतात. या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी असते. या मार्गावर बस, ट्रक, मोटारसायकल व इतर सर्व वाहने सुसाट वेगाने ये जा करतात. रस्ता ओलांडताना मोठे अपघात होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते. म्हणून शहादा ते खेतिया या मुख्य मार्गावर लोणखेडा चौफूली, सुतगिरणी फाटा, कालेज इत्यादी ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी बिरसा फायटर्स़ संघटनेकडून कार्यकारी अभियंता शहादा यांच्याकडे केली आहे.