*थकीत झालेल्या घरपट्टीमध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*थकीत झालेल्या घरपट्टीमध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध*
*थकीत झालेल्या घरपट्टीमध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरात घरपट्टी, नळपट्टी व विविध प्रकरचे टैक्स लावुन वसुल करण्यात येत आहे परंतु मागील काही वर्षापासुन थकलेल्या नगर पालिकेचे घरपट्टी, नळपट्टीमध्ये मुळ रक्कमेत अधिक प्रकारचे दंडात्मक व्याज लावण्यात आलेले आहे.
नंदुरबार नगर परिषदेने थकीत मुळ रक्कमच वसुल करावी त्यावर कोणत्याही प्रकारचे अधिकचे दंडात्मक व्याज लावू करु नये. त्यावर सुट देण्यात यावी तसेच थकलेल्या मुळ रक्कमेत नागरिकांना सवलत देऊन दोन-तीन हप्तात घरपट्टी वसुल करण्यात यावी. कारण नंदुरबार शहरात कोणत्याही प्रकारचे कामधंदे नसुन महागाईमुळे जनता त्रस्त झालेली आहे. त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे नागरिक इकडुन तिकडून पैसे गोळा करुन घरपट्टी व पाणीपट्टी भरत आहे, म्हणून अश्या सर्व लोकांचा विचार करुन थकलेल्या घरपट्टीवर
कोणत्याही प्रकारचे अधिकचे दंडात्मक व्याज लावण्यात येवु नये अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे सदर मागणीची निवेदन मुख्याधिकारी शिवांश सिंग यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख पंडित माळी, उपजिल्हाप्रमुख डॉ हेमंत शर्मा, उप तालुकाप्रमुख बापू महाजन, महेंद्र गिरासे, सुनिल पवार, अल्पसंख्याक सेलचे उपजिल्हाप्रमुख इम्तियाज कुरेशी, किसान सेलचे तालुकाप्रमुख निंबा पाटील, उदेसिंग रामसिंग, इम्तियाज खान, जाफर शहा, बबलू नागरे व शिवसैनिक उपस्थित होते. जर आठ ते पंधरा दिवसात योग्य ती कारवाई केली नाही तर शिवसेना नगरपालिका कार्यालयासमोर शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल व होणाऱ्या सर्व परिणामाला प्रशासन जबाबदार राहील.



