*चावरा स्कूल नंदुरबार यांचा रौप्य महोत्सव (सिल्व्हर जुबिली) भव्य सोहळा अत्यंत उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चावरा स्कूल नंदुरबार यांचा रौप्य महोत्सव (सिल्व्हर जुबिली) भव्य सोहळा अत्यंत उत्साहात साजरा*
*चावरा स्कूल नंदुरबार यांचा रौप्य महोत्सव (सिल्व्हर जुबिली) भव्य सोहळा अत्यंत उत्साहात साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-चावरा स्कूल नंदुरबार यांचा रौप्य महोत्सव (सिल्व्हर जुबिली) भव्य सोहळा 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या रौप्य महोत्सवाची संकल्पना “सिल्व्हर स्पार्कल्स” अशी होती. या
महोत्सवाची सुरुवात नवीन शाळा वास्तू इमारतीच्या उद्घाटनाने करण्यात आली, कार्यक्रमाचे अध्यक्ष बिशप थॉमस एलावनाल होते. नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
कार्यक्रमाला अतिथी म्हणून नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी, फादर जोसे नंदीक्कारा आणि फादर जॉय वट्टोली उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात बिशप थॉमस एलावनाल यांनी सध्याच्या काळात शिक्षणाचे महत्त्व व मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज यावर प्रकाश टाकला. मुख्य अतिथी चंद्रकांत रघुवंशी यांनी दर्जेदार शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत शाळेच्या व्यवस्थापन व शिक्षकांच्या त्यागमय सेवाभावाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात कौटुंबिक मूल्ये व सामाजिक बांधिलकी यांचे प्रभावी दर्शन घडवण्यात आले. नाट्य व नृत्य सादरीकरणातून मूल्यांचे तेज समाजात कसा सकारात्मक बदल घडवू शकते हे सुंदररीत्या मांडण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप “जय जगत” या वैश्विक शांततेच्या संदेशाने झाला. गेल्या 25 वर्षांच्या गौरवशाली प्रवासात चावरा स्कूलने विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन घडवले आहे. या सोहळ्यास चावरा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक फादर जॉन, फादर थॉमस व फादर अँटोनी यांचीही उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला सुमारे 5000 नागरिकांची उपस्थिती लाभली. रौप्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापनातील फादर्स व सिस्टर्स, शिक्षकवर्ग, कर्मचारी व पालक- शिक्षक संघ (PTA) यांचे मोलाचे योगदान लाभले.
रौप्य महोत्सवाचा समारोप “मूल्यांचे तेज बनूया” या प्रेरणादायी संदेशाने करण्यात आला, ज्यातून आगामी काळासाठी दिशादर्शक विचार मांडण्यात आले.



