*नंदुरबार तालुक्यात सन 2025-26या महसूल वर्षात महसूली वसूली, प्लॉट धारक यांनी सदर भुखंडाची अकृषक आकारणी, वसुली भरणे बाबत तहसीदार यांचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुक्यात सन 2025-26या महसूल वर्षात महसूली वसूली, प्लॉट धारक यांनी सदर भुखंडाची अकृषक आकारणी, वसुली भरणे बाबत तहसीदार यांचे आवाहन*
*नंदुरबार तालुक्यात सन 2025-26या महसूल वर्षात महसूली वसूली, प्लॉट धारक यांनी सदर भुखंडाची अकृषक आकारणी, वसुली भरणे बाबत तहसीदार यांचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यात सन 2025-26 या महसूल वर्षात महसूली वसूली, अकृषिक आकारणी वसुली अशी मिळून सुमारे एक कोटी पेक्षा जास्त रकमेची वसुली बाकी आहे. नंदुरबार तालुक्यातील मौजे होळ त. हवेली, नळवे खुर्द, पातोंडा, पथराई, नंदुरबार, करजकुपे, खामगांव, दुधाळे, टोकरतळे, व चौपाळे या गावांमध्ये अनेक प्लॉट धारकांनी एन.ए प्लॉट खरेदी केले आहेत. सर्व प्लॉट धारक यांनी सदर भुखंडाची अकृषक आकारणी, वसुली भरणे बाबत दोन नोटीस आधीच प्रसिध्द केले आहेत.
सर्व थकबाकीदार जसे महसूली वसूली, अकृषिक आकारणी वसुली, या प्रकारातील कोणतीही चालू मागणी व थकबाकी भरणा बाकी असलेल्या सर्व खातेदारांना याद्वारे कळविण्यात येते की, आपणाकडे असलेली थकबाकी व चालू मागणीची रक्कम तात्काळ संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे भरणा करण्यात यावी. तसेच, ज्या खातेदारांची थकबाकी भरणे बाबत नोटीस देण्यात आलेल्या असुन, देखील थकबाकी भरणा केलेला नाही अशा खातेदाराच्या 7/12 उताऱ्यावर थकबाकीचा बोजा दाखल करणेत आला असून, सदर थकबाकी भरण्याचा दिनांक 20 फेब्रुवारी 2026 पर्यत आहे. सदर भरणा केला नाही तर सदर मिळकतीचा लिलाव केला जाईल यांची नोंद घ्यावी. सदर बोजाची नोंद झाले नंतर सदर भुखंड हस्तांतरण, तारण, खरेदी विक्री करणेच्या प्रकियेस अडथळा निर्माण होईल यांची नोंद घेऊन तात्काळ संबंधित यांचेशी संपर्क करुन आपले भूखंडाची अकृषक कराचा भरणा करावा. तसे नाही केल्यास जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी नंदुरबार यांनी बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 179 नुसार समपहरणाची नोटीस बजावून आपली जंगम मालमत्ता अटकावून ठेवणे व जप्ती करणे, तिची विक्री करणे अशी महसुल वसुली बाबतच्या नियमानुसार प्रक्रिया करून विक्रीतून सदरची रक्कम शासन जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. यास्तव, नंदुरबार तालुक्यातील उपरोक्त वसुली पात्र थकबाकीदार यांना थकबाकीची रक्कम त्वरीत शासन जमा करण्याबाबत प्रदिप पवार तहसिलदार नंदुरबार यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.



