*बामखेडा महाविद्यालयात विद्यार्थ्यी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालयात विद्यार्थ्यी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप*
*बामखेडा महाविद्यालयात विद्यार्थ्यी 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे त.त., ता. शहादा, जि. नंदुरबार येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी Resonance Pvt. Ltd., पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या 15 दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप उत्साहात पार पडला. या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव बी. व्ही. चौधरी होते. प्रमुख वक्ते प्रा. एन. डी. पाटील यांनी समुपदेशन कौशल्याचे महत्त्व विशद करताना, श्रीकृष्णाने अर्जुनाच्या गलितगात्र अवस्थेतून त्याला कर्मयोगाची जाणीव करून देत युद्धासाठी प्रेरित केल्याचा संदर्भ देत, ज्ञानाचा योग्य आणि विधायक वापर करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी प्रास्ताविकातून सॉफ्ट स्किल्स कार्यशाळेत मिळालेली कौशल्ये व त्यासाठी संस्था, रेझोनन्स पुणे व पीएमउषा यांच्या सहकार्याचा उल्लेख केला. या कार्यशाळेत शहादा व शिरपूर येथील चार महाविद्यालयांमधील एकूण 85 विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. समारोप प्रसंगी एकुण दहा विद्यार्थ्यांनी कार्यशाळे दरम्यान मिळालेल्या अनुभवांविषयी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समन्वयक डॉ. वाय. आर. पाटील यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले.



