*विधवा व निराधार व्यक्ती 1 वर्षांपासून पेन्शन पासून वंचित,आर्थिक मदत देण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विधवा व निराधार व्यक्ती 1 वर्षांपासून पेन्शन पासून वंचित,आर्थिक मदत देण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
*विधवा व निराधार व्यक्ती 1 वर्षांपासून पेन्शन पासून वंचित,आर्थिक मदत देण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
शहादा(प्रतिनिधी):-श्रीमती जीजाबाई विजय पवार राहणार लोहारा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांना व इतर लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेची आर्थिक मदत पेन्शन गेल्या 1 वर्षांपासून मिळालेली नाही, ती आर्थिक मदत पेन्शन तात्काळ मिळावी, अशी मागणी बिरसा फायटर्स़ नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्या कडे करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजनांतर्गत शासनाकडून निराधार व्यक्ती, विधवा, दिव्यांश, आजार ग्रस्त, अनाथ व्यक्तींना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत (पेन्शन) मिळते. परंतु या योजने अंतर्गत जीजाबाई विजय पवार रा. लोहारा ता.शहादा जिल्हा नंदुरबार यांना व इतर अनेक लाभार्थ्यी व्यक्तींना गेल्या 1 वर्षांपासून आर्थिक मदत (पेन्शन) मिळत नाही आहे. त्यामुळे निराधार व्यक्तींना आपल्या घरचा प्रपंच चालवायला मोठी अडचण निर्माण झाली आहे. निराधार व्यक्तींवर आर्थिक संकट येऊन उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून जीजाबाई विजय पवार रा. लोहारा ता. शहादा जिल्हा नंदुरबार यांना व इतर लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेची आर्थिक मदत पेन्शन गेल्या 1 वर्षांपासून मिळाले नाहीत, ती आर्थिक मदत तात्काळ मिळावी, अशी मागणी बिरसा फायटर्स़ संघटनेकडून जिल्हाधिकारी व तहसीलदारांना करण्यात आली आहे.



