*चिमठाणे शाळेतील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करणा-याला कठोर शिक्षा करा-बिरसा फायटर्सची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चिमठाणे शाळेतील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करणा-याला कठोर शिक्षा करा-बिरसा फायटर्सची मागणी*
*चिमठाणे शाळेतील अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करणा-याला कठोर शिक्षा करा-बिरसा फायटर्सची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सुरची विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चिमठाणे येथील एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अधिक्षक व संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करून कठोर शिक्षा व्हावी,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी धुळे यांच्या कडे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सुरची विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चिमठाणे येथील अधिक्षक यांनी एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स़ संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो. शाळकरी आदिवासीं मुलींवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत चालले आहेत. त्यामुळे मुलांच्या पालकांमध्ये आपली मुल मुली शाळेत सुरक्षित नाहीत, असुरक्षित आहेत,अशी भावना निर्माण झाली आहे. चिमठाणे येथील घटनेनंतर आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे. म्हणून सदर प्रकरण जलद न्यायालयात चालविण्यात यावे. तरी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील सुरची विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चिमठाणे येथील एका आदिवासी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अधिक्षक व संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी. अन्यथा बिरसा फायटर्स़ संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.



