*शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ-सुंदरसिंग वसावे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ-सुंदरसिंग वसावे*
*शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ-सुंदरसिंग वसावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय वसतीगृहांमध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी आता मुदतवाढ देण्यात आली असून व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग, अनाथ, दिव्यांग, आ.दु.घ प्रवर्गमधील विद्यार्थ्यांना आता 15 फेब्रूवारी 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
जिल्ह्यातील मुलांचे एक व मुलींचे एक अशा एकूण 2 शासकीय वसतीगृहांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक:
शासकीय वसतीगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे: ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी: 6 ते 15 फेब्रुवारी 2026.
अर्जांची छाननी: 16 ते 18 फेब्रुवारी 2026. प्रथम निवड यादी प्रसिद्ध होणे: 20 फेब्रुवारी 2026.
निवड यादीनुसार प्रवेश घेण्याची अंतिम मुदत: 26 फेब्रुवारी 2026.
अर्ज करण्याची पद्धत: पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतीगृहाचे गृहपाल किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे जमा करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन सहाय्यक संचालक वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



