*राजापूर चिखले येथे चिल्ड्रन्स हार्ट फाउंडेशन तर्फे ब्लँकेट व रेशन कोटचे वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर चिखले येथे चिल्ड्रन्स हार्ट फाउंडेशन तर्फे ब्लँकेट व रेशन कोटचे वाटप*
*राजापूर चिखले येथे चिल्ड्रन्स हार्ट फाउंडेशनतर्फे ब्लँकेट व रेशन कोटचे वाटप*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील चिखले गावामध्ये चिल्ड्रन्स हार्ट फाउंडेशन विरार यांच्या मार्फत गरजू व्यक्तींना मोफत ब्लँकेट आणि रेशन किट वाटप करण्यात आले. गेली पाच वर्षे या संस्थेच्या वतीने आपली सामाजिक बांधिलकी जोपासताना गावात सामाजिक कार्य केले आहे. यापूर्वी चिखले गावासाठी या संस्थेच्या मार्फत शाळेला लॅपटॉप तसेच शाळेला लागणारे साहित्य देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे गेली पाच वर्ष ही संस्था जुलै महिन्यात चिखले शाळेला बॅग, टिफीन, रेनकोट, छत्री वाटप करत आहे. त्याच सोबत बाजूच्या दसुर व कोंडदसुर शाळेला देखील साहित्य वाटप करत आहे. या सर्व कार्यक्रमासाठी स्वतः अमरीन पेंटर, राकेश नेमणे, वैभव खेडेकर तसेच त्यांचे सहकारी उपस्थित असतात. तसेच या सर्व गोष्टी गावामध्ये होण्यासाठी सतत प्रयत्न करणारे चिखले गावचे ग्रामस्थ प्रविण शालिनी पांडुरंग तांबे यांचे आभार व्यक्त केले.



