*ज्ञानभारती विद्यालयात आमदार राजेश बकाणे यांच्या वाढदिसानिमित शालेय साहित्याचे वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ज्ञानभारती विद्यालयात आमदार राजेश बकाणे यांच्या वाढदिसानिमित शालेय साहित्याचे वाटप*
*ज्ञानभारती विद्यालयात आमदार राजेश बकाणे यांच्या वाढदिसानिमित शालेय साहित्याचे वाटप*
पुलगाव(प्रतिनिधी):-स्थानिक युवकभारती शिक्षण संस्था पुलगाव द्वारा संचालित ज्ञानभारती विद्यालय पुलगाव येथे पुलगाव - देवळी मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार राजेश बकाणे यांच्या वाढदिसानिमित गरजू , होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यात प्रत्येकी विद्यार्थ्याला तीन नोटबुक, पेन्सिल, रबर आणि शार्पनर देण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शोभाताई वासनकर, प्राचार्या सौ. सुनीता भुरुकुंडे, नगरसेवक दुर्गेश यादव उपस्थित होते तर ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र गडेकर व सागर टिप्रमवार यांनी या कार्यक्रमाकरिता अर्थसहाय्य केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले व पालकवर्गाने समाधान व्यक्त केले. तर या उपक्रमाचे संस्थेचे सचिव ॲड नितीन रावेकर यांनी व संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड सौ नेहा रावेकर यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अक्षय बाळापुरे यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक अनिल माहूरे, अर्चना पोटदुखे, सागर टिप्रमवार , प्रवीण संभे, श्रीकांत बोबडे, अतुल साळवे, संजय कुंभारे, मंजिरी धांदे, प्रदीप रावेकर, मोना केने, अश्विनी गायकवाड, पल्लवी हरडे, आशिष उभाड व हरीश बहिरम उपस्थित होते.



