*अनुसूचित जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना,2026-27 वर्षासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अनुसूचित जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना,2026-27 वर्षासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू*
*अनुसूचित जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना,2026-27 वर्षासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून सन 2026 -27 या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी (PhD) अभ्यासक्रमासाठी परदेशात शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला असेल, अशा पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर (तळोदा) व चंद्रकांत पवार (नंदुरबार) यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
योजनेचे मुख्य तपशील: लक्षांक : या योजनेअंतर्गत एकूण 40 पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. शिक्षण संस्था पात्रता: विद्यार्थ्याने ज्या परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला आहे, तिचे ‘QS (Quacquarelli symonds) World Ranking’ 200 च्या आत असणे बंधनकारक आहे. पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास ही मर्यादा 300 रँकिंगपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. उत्पन्न मर्यादा: विद्यार्थ्याच्या पालकांचे (आणि विद्यार्थी नोकरी करत असल्यास त्याचे स्वतःचे) मागील आर्थिक वर्षातील (2025 -26) एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखांपेक्षा जास्त नसावे. विशेष परिस्थितीत ही मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढवण्यात येईल.
पात्रतेचे इतर निकष: उमेदवार आणि त्याचे पालक भारताचे नागरिक व महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
ही शिष्यवृत्ती केवळ परदेशातील उच्च शिक्षणासाठीच लागू राहील. अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आदिवासी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://fs.maharashtra.gov.in येथे ऑनलाइन पद्धतीने भरावेत. अर्जासोबत आवश्यक मूळ प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपातील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांनी योजनेच्या अधिक माहिती, अटी व शर्तींसाठी वरील संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्जा संदर्भातील पुढील सर्व सूचना उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या ईमेलवर पाठवल्या जातील, असेही आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर (तळोदा) व चंद्रकांत पवार (नंदुरबार) यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



