*हैदराबाद येथील 'नॅशनल येस समिट'मध्ये नंदुरबारचा डंका; 27 उद्योजकांचा सहभाग, तिघांनी पटकावले राष्ट्रीय विजेतेपद देशातील 20 राज्यांच्या प्रतिनिधींसमोर नंदुरबारच्या उत्पादनांची छाप, महिला आण
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हैदराबाद येथील 'नॅशनल येस समिट'मध्ये नंदुरबारचा डंका; 27 उद्योजकांचा सहभाग, तिघांनी पटकावले राष्ट्रीय विजेतेपद देशातील 20 राज्यांच्या प्रतिनिधींसमोर नंदुरबारच्या उत्पादनांची छाप, महिला आण
*हैदराबाद येथील 'नॅशनल येस समिट'मध्ये नंदुरबारचा डंका; 27 उद्योजकांचा सहभाग, तिघांनी पटकावले राष्ट्रीय विजेतेपद देशातील 20 राज्यांच्या प्रतिनिधींसमोर नंदुरबारच्या उत्पादनांची छाप, महिला आणि युवकांचा परिषदेत लक्षणीय सहभाग*
नंदूरबार(प्रतिनिधी):-युथएड फाउंडेशन, युथ एंटरप्रेन्युअर फेडरेशन ऑफ इंडिया (YEFI), TGIC आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ MSME, तेलंगणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित '9 वी नॅशनल येस समिट' ही राष्ट्रीय स्तरावरील उद्योजकता परिषद हैदराबाद येथे 5 ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान अत्यंत उत्साहात पार पडली. या परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील उद्योजकांनी केवळ सहभागच नोंदवला नाही, तर आपल्या कल्पकतेने आणि दर्जेदार उत्पादनांनी राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उंचावले. विशेष म्हणजे, या परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील महिला उद्योजक आणि युवा वर्गाचा सहभाग अत्यंत मोठा आणि प्रेरणादायी होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आत्मनिर्भरतेचा मंत्र
या भव्य परिषदेचे उद्घाटन नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी उपस्थित 600 हून अधिक सहभागींना उद्योजकतेचे महत्त्व पटवून दिले. "युवकांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत नवकल्पनांच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करावी," असे आवाहन त्यांनी यावेळी केले. परिषदेला देशातील 20 राज्यांमधून उद्योजक, महिला उद्योजक, विद्यार्थी आणि देश- विदेशातील तज्ज्ञांनी उपस्थिती लावून उद्योजकता संबंधित सूक्ष्म व अतिसूक्ष्म महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. नंदुरबारच्या 'या' उद्योजकांनी मारली बाजी
परिषदेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 'बिझनेस पिचिंग कॉम्पिटिशन' (व्यवसाय सादरीकरण स्पर्धा) मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 15 उद्योजकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 'फूड प्रोसेसिंग' क्षेत्रात उत्कृष्ट सादरीकरण करून जिल्ह्यातील तीन उद्योगांची विजेते म्हणून निवड करण्यात आली, त्यात मयुरी मिलेट्स (रागी लड्डू) मयुरी राजेश निकुंबे, बद्रीकेदार प्रायव्हेट लिमिटेड वैभव रघुवंशी, विशाल ट्रायबल पावडर विशाल माधव वसावे
विजेत्यांसह स्पर्धेतील इतर सर्व सहभागी उद्योजकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विक्री प्रदर्शनात 'ब्रँड नंदुरबार'ची मोहिनी
परिषदेत आयोजित विक्री प्रदर्शनात नंदुरबारसाठी विशेष स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला होता. या स्टॉलमध्ये जिल्ह्यातील खालील उद्योजकांनी आपली उत्पादने आकर्षक रित्या मांडली मयुरी खाकरा (सक्षम गृह उद्योग), शिवशक्ती हळदी पावडर.
नर्मदा पुनर्वसन (मशरुम उद्योग), राजेश्वरी मिरची पावडर. मोगी भोग (मोहा लाडू), विश्वाची परिवार (तांदूळ विक्री व्यवसाय). कालो कुणबी सेवाभावी संस्था, श्री बद्री केदार प्रा. लि., विशाल ट्रायबल पावडर. सूर्यदर्शन फार्म प्रोड्युसर कंपनी, वेद ऊर्जा (हेअर ऑईल सोल्युशन). समर्थ ग्रुप उद्योग (पुरणपोळी रिमिक्स), प्रतीक चार्टकोण (मिलेट चार्ट झिरो वेस्ट).
मीनाक्षी आर्ट अँड क्राफ्ट. प्रशासनाचे पाठबळ आणि यशस्वी नेतृत्व
ही परिषद तीन दिवसांची असून महिला उद्योजक व युवकांमध्ये उद्योजकता विकसित करणे, स्टार्टअप्स घडवणे आणि उद्योजकांची समाज व अर्थव्यवस्थेतील भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या संपूर्ण उपक्रमाचे नंदुरबार जिल्हा समन्वयक व टीम लीडर शिवाजी परमार (CYDA, YEFi, Youthaid Foundation) आणि वैष्णवी डोहकर यांनी यशस्वी नेतृत्व केले.
या मोहिमेला नंदुरबार जिल्हा प्रशासन, कृषी विज्ञान केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर आणि नीती आयोगाच्या वैष्णवी डोहकर यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. ग्रामीण व आदिवासी भागातील महिला आणि तरुण उद्योजकांसाठी ही परिषद राष्ट्रीय स्तरावर झेप घेणारी एक महत्त्वपूर्ण पायरी ठरली आहे.



