*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप संमारंभ संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप संमारंभ संपन्न*
*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप संमारंभ संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुल येथे इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यासाठी निरोप समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी शाळेचे चेअरमन किशोर वाणी, व्हा. चेअरमन सिध्दार्थ वाणी, प्राचार्या डॉ. छाया शर्मा, उपप्राचार्य व समन्वयक आणी सर्व शिक्षकवृदांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व प्रथम देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर नृत्य, खेळ, विनोद, भाषणं यांची भर या कार्यक्रमावर पडली.
श्री किशोरभाई यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात यश प्राप्ती साठीचे उपयोगी कानमंत्र दिले व प्रोत्साहीत केले. प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की विद्यार्थ्यांनी प्रामाणिक, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक दृष्टीकोन देवून अभ्यास केला व निश्चित ध्येय गाठण्यासाठी सर्व शिक्षकवृंदानी मार्गदर्शन केले. असाच त्यांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. किशोर वाणी यांनी शाळेकडुन 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्या.



