ताजा खबरे:
*घुणकी जिल्हा परिषद व पंचायत समितीत चुरशीने मतदान 73.6% टक्के*
*जी टी पाटील महाविद्यालययात आदिवासी समुदाय विकास कार्यशाळा संपन्न*
*माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय रुग्णालयात वंचित बहुजन आघाडी तर्फे रक्तदान शिबिरात 22 दात्यानी केले रक्तदान*
*बडोदा येथे प.पू. महंत स्वामी महाराजांचा 92 वा जन्मजयंती महोत्सव भव्य व दिव्य वातावरणात साजरा*
*ज्ञानभारती विद्यालय, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जमनालाल बजाज ट्रस्ट सेवा केंद्र वर्धा द्वारा मोबाईल व्हॅन द्वारा सायन्सचे प्रात्यक्षिक*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जी टी पाटील महाविद्यालययात आदिवासी समुदाय विकास कार्यशाळा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जी टी पाटील महाविद्यालययात आदिवासी समुदाय विकास कार्यशाळा संपन्न*

  • Share:

*जी टी पाटील महाविद्यालययात आदिवासी समुदाय विकास कार्यशाळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि जी टी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (पीएम उषा) शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या विशेष साहाय्यातून 'आदिवासी समुदाय विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे अध्यक्ष कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्या‌पीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य प्रा डॉ.एम.जे.रघुवंशी होते. कार्यशाळेचे उद्‌घाटक नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक प्रा.डॉ.एम.एस.रघुवंशी होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा. डॉ.मंदा गावीत, माजी उपकुलसचिव जी.एन.पवार, प्रा. डॉ.मोहन पावरा, प्रा.डॉ.खुमानसिंग वळवी उपस्थित होते. कार्यशाळेच्या अध्यक्षीय  मनोगतात प्राचार्य प्रा.डॉ.एम.जे. रघुवंशी यांनी
आदिवासी विद्यार्थ्यांनी न्यूनगंडाची भावना सोडून प्रत्येक क्षेत्रात पुढे येण्यासाठी संघर्ष करावे, आपल्याकडील मोबाईलचा वापर करून सबंध विश्वाला समजून घेण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन करताना; विविध खेळात जिद्द, चिकाटीच्या जोरावर, कौशल्याच्या बळावर यशस्वी होणाऱ्या आदिवासी युवकांचे कौतुक केले.
कार्यशा‌ळेचे उद्‌घाटक प्रा.डॉ. एम.एस.रघुवंशी यांनी आदिवासी युवकांनी विविध संधीचा उपयोग करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन करताना आदिवासी युवकांनी आपल्या अंगी असलेल्या क्षमतांचा, कौशल्याचा विकास करावा असे प्रतिपादन केले. सदर कार्यशाळेविषयीची भूमिका कार्यशाळेचे समन्वयक डॉ.जी. एस.ठाकरे यांनी मांडली. सूत्रसंचालन डॉ माधव कदम आणि आभार प्रदर्शन डॉ दिनेश देवरे यांनी केले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा. डॉ.मंदा गावीत यांनी आदिवासी समाजातील सामाजिक व आर्थिक प्रश्न या विषयावर मांडणी करताना आदिवासी युवकांनी पुढाकार घेऊन समाजातील अंधश्रद्धा नाहिशा करण्यासाठी प्रयत्न करताना निसर्गाशी संबंधित असलेल्या लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करावे असे आवाहन केले आहे.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात माजी उपकुलसचिव जी. एन.पवार यांनी ‘शिक्षणातून परिवर्तन’ या विषयावर मांडणी करताना विविध शैक्षणिक अभ्यासक्रमातून आदिवासी युवक आणि आदिवासी समाज यांचा विकास साधता येईल असे प्रतिपादन केले. कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात प्रा डॉ मोहन पावरा यांनी उद्योजकतेची बीजे: आदिवासी युवकांसाठी संधी, कौशल्ये आणि आव्हाने’ या विषयावर मांडणी करताना आपल्या जीवनातील संघर्षात्मक अनुभव सादर करत विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधींचे सोने करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात प्रा डॉ खुमानसिंग वळवी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवनकौशल्य विकास या विषयावर मांडणी करताना आधुनिक जगात स्वतःला सक्षम करण्यासाठी आदिवासी युवकांनी भाषिक कौशल्ये नि संवाद कौशल्यांचा विकास साधला पाहिजे असे आवाहन केले आहे.
समारोप कार्यक्रम प्रसंगी कणिका वळवी, या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रातिनिधिक स्तरावर काही सहभागी विद्यार्थांना पाहुण्यांचे हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन डॉ सुभाष ठाकरे, डॉ सुलतान पवार, डॉ विजय चौधरी, डॉ वसीम मक्राणी, प्रा श्याम पवार, प्रा सचिन आढावे, प्रा प्रमेश वसावे, प्रा राहुल पाटील, प्रा महेंद्र गावित, प्रा प्रल्हाद वसावे यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*घुणकी जिल्हा परिषद व पंचायत समितीत चुरशीने मतदान 73.6% टक्के*
February, 07 2026
*जी टी पाटील महाविद्यालययात आदिवासी समुदाय विकास कार्यशाळा संपन्न*
February, 07 2026
*माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय रुग्णालयात वंचित बहुजन आघाडी तर्फे रक्तदान शिबिरात 22 दात्यानी केले रक्तदान*
February, 07 2026
*बडोदा येथे प.पू. महंत स्वामी महाराजांचा 92 वा जन्मजयंती महोत्सव भव्य व दिव्य वातावरणात साजरा*
February, 07 2026
*ज्ञानभारती विद्यालय, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जमनालाल बजाज ट्रस्ट सेवा केंद्र वर्धा द्वारा मोबाईल व्हॅन द्वारा सायन्सचे प्रात्यक्षिक*
February, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज