*ज्ञानभारती विद्यालय, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जमनालाल बजाज ट्रस्ट सेवा केंद्र वर्धा द्वारा मोबाईल व्हॅन द्वारा सायन्सचे प्रात्यक्षिक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ज्ञानभारती विद्यालय, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जमनालाल बजाज ट्रस्ट सेवा केंद्र वर्धा द्वारा मोबाईल व्हॅन द्वारा सायन्सचे प्रात्यक्षिक*
*ज्ञानभारती विद्यालय, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जमनालाल बजाज ट्रस्ट सेवा केंद्र वर्धा द्वारा मोबाईल व्हॅन द्वारा सायन्सचे प्रात्यक्षिक*
पुलगाव(प्रतिनिधी):-स्थानिक युवकभारती शिक्षण संस्था पुलगाव द्वारा संचालित ज्ञानभारती विद्यालय, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जमनालाल बजाज ट्रस्ट यांच्या द्वारा विज्ञान विषयाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी प्राचार्या सौ. सुनीता भुरुकुंडे, मुख्याध्यापिका सौ शोभा वासनकर तसेच विज्ञान शिक्षक सुनील शिलसकर, सौ. श्वेता मोरे, नितेश राऊत, दिलीप बाहेती व प्राथमिक विभागाचे सागर टिप्रमवार तर जमनालाल बजाज ट्रस्टच्या बायोलोजीच्या शिक्षिका भाग्यश्री घरजाळे, भाग्यश्री मुन सहायक प्रकल्प अधिकारी व मृदुला पाटिल सहाय्यक प्रकल्प अधिकारी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे विविध प्रकारचे प्रयोग व उपकरणे दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सुनील शिलसकर यांनी तर आभार प्रदर्शन देवेंद्र गडेकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठया प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते.