*ईळेगाव गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा सुरु, महसूल विभागाचा कानाडोळा?*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ईळेगाव गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा सुरु, महसूल विभागाचा कानाडोळा?*
*ईळेगाव गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा सुरु, महसूल विभागाचा कानाडोळा?*
नांदेड(प्रतीनिधी):-नांदेडच्या उमरी तालुक्यातील उमरी पोलीस ठाणे हद्दीतील " ईळेगाव " गावाजवळील गोदावरी नदीपात्रातून काही वाळूमाफीया रात्रंदिवस अवैध वाळू उपसा बेलगामपणे करीत आहेत मात्र उमरीच्या तहसीलदार या अवैध वाळू उपशाकडे जानीवपुर्वक दुर्लक्ष का करीत आहेत असा प्रश्न सुजान नागरीकांतून उपस्थीत केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोणताही लिलाव झाला नसताना देखील दररोज विस ते पंचवीस तराफ्यांच्या सहाय्याने खुलेआम वाळू उपसा करुन अनेक वाहनांतून खुलेआम विक्री केला जातो मात्र संबंधित नायब तहसीदार, मंडळअधिकारी, ग्राम महसुल अधिकारी तसेच संबंधीत पोलीस निरीक्षक, बिट जमादार, पर्यावरण विभागाचे अधिकारी यांच्याकडून अर्थपुर्ण दुर्लक्ष झाल्याचे बोलल्या जात आहे. असो गोदावरीसारख्या पवित्र नदीचे अस्तित्व धोक्यात घालणारा हा प्रकार मागील गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून, नदीपात्र खोलवर पोखरले जात आहे. यामुळे नदीकाठची शेती, पाणीपुरवठा योजना, तसेच पूरस्थितीचा धोका वाढणारा आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही कारवाई शून्यच असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळूमाफिया अधिकच सक्रिय होत आहेत पोलिस गस्त व महसूल यंत्रणा केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे चित्र आहे. हा प्रकार थांबविण्याऐवजी काही अधिकारी वाळू माफियांना संरक्षण देत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. “गरीबावर कायदा, माफियांवर मेहेरबानी?” असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत असून, तात्काळ मोठी कारवाई करून दोषी अधिकारी व वाळू माफियांवर गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. या गंभीर प्रकरणाकडे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष देऊन विशेष पथक नेमावे, अवैध तराफे जप्त करावेत व महसूल –पोलीस यंत्रणेतील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अन्यथा काही सामाजिक संघटना व नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबीण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोदावरी नदी वाचवायची की माफियांना पाठीशी घालायचे? प्रशासन आता तरी जागे होईल काय ? असा संतप्त सवालही सामान्य नागरिकांतून पुढे येताना ऐकावयास मिळतो आहे.



