*माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय रुग्णालयात वंचित बहुजन आघाडी तर्फे रक्तदान शिबिरात 22 दात्यानी केले रक्तदान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय रुग्णालयात वंचित बहुजन आघाडी तर्फे रक्तदान शिबिरात 22 दात्यानी केले रक्तदान*
*माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय रुग्णालयात वंचित बहुजन आघाडीतर्फे रक्तदान शिबिरात 22 दात्यानी केले रक्तदान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनसंघर्षात खंबीर साथ देणाऱ्या, त्याग आणि समर्पणाची मूर्ती असलेल्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शासकीय रुग्णालय, नंदुरबार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि मानवतेची सेवा घडावी या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला युवक, समाजबांधव व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान करून सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमास नंदुरबार जिल्हा अध्यक्ष पावभा भिकन आखाडे, जेष्ठ कार्यकर्त्या राणी गावित, कृष्णा सामुद्रे, नयन भिल, देवबा पिंपळे, निलेश गुलाले यांच्यासह
समाजबांधव व इतर कार्यकर्ते
यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवरांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनकार्याचे स्मरण करून सांगितले की, “समाजासाठी कार्य करणे आणि गरजूंना मदत करणे हीच माता रमाईंना खरी आदरांजली आहे.” यावेळी भविष्यातही समाजोपयोगी व जनकल्याणकारी उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



