*घुणकी जिल्हा परिषद व पंचायत समितीत चुरशीने मतदान 73.6% टक्के*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घुणकी जिल्हा परिषद व पंचायत समितीत चुरशीने मतदान 73.6% टक्के*
*घुणकी जिल्हा परिषद व पंचायत समितीत चुरशीने मतदान 73.6% टक्के*
कोल्हापूर(प्रतिनिधी):-कोल्हापूर जिल्ह्यातील घुणकी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नवे पारगाव पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत आज घुणकी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे चुरशीने मतदान झाले असल्याचे दिसून आले. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष व जनसुराज्य पक्ष हे दोन पक्ष थेट लढत लढत असल्याने या मतदारसंघात चुरस निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉ.विनय कोरे यांच्या प्रचार सभा झाल्याने संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्तेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आज चुरशीने मतदान झालेले दिसून आले आहे. या संपूर्ण घुणकी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात एकूण स्त्री-पुरुष मतदान 33587 पैकी 24539 मतदान झालेले पूर्ण टक्केवारी 73. 06% असे झालेले आहे.
निलेवाडी 1470 पैकी 1192
( 81.01%), जुने पारगाव 4444 पैकी
3345 ( 75.30%),
नवे पारगाव 5617 पैकी 3987 (70.90%), तळसंदे 5286 पैकी 3884
(73.50%), नवे/ जुने चावरे 3708 पैकी 2683 (72.36%), घुणकी 6865 पैकी 5245
(76.40%), किणी 6197 पैकी 4203
(67.10), संपूर्ण मतदारसंघात एकूण स्त्री पुरुष मतदान 33587 पैकी 24539 मतदान झालेले आहे. (संपूर्ण एकूण 73.06) टक्के मतदान झालेलं आहे. यावेळी लोक प्रतिनिधी जनसुराज्य पक्षाचे हातकणंगले मतदारसंघाचे आमदार डॉ अशोक माने व काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजु आवळे यांनी भेट दिली व मतदान केंद्रावर जाऊन प्रक्रियेचा आढावा घेतला. ही निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी चोक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी निवडणूक झोनल अधिकारी संकेत गायकवाड, सहाय्यक प्रवीण पवार, यासाठी वडगाव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ ए एन पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक ए एस जमादार, महिला पोलिस स्वाती कांबळे, स्नेहल पाटील, गावचे पोलिस पाटील संदीप तेली, याचबरोबर भादोले प्राथमिक केंद्राचे प्रमुख अनिल महिंद, आरोग्य सेविका जयश्री चव्हाण, आरोग्य सेवक अमोल मदने, तसेच आशा स्वयंसेविका मदतनीस, आणि गावच्या तलाठी सौ एस व्हि चौगुले, ग्रामसेवक धनाजी शिंदे, वरिष्ठ लिपिक प्रदीप मोहिते, कनिष्ठ लिपीक श्रीकांत मोहिते, शिपाई कृष्णात सूर्यवंशी, या सर्व यंत्रणेकडून दिव्यांग व्यक्तीसाठी व्हील चेअर, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, चहा नाष्टा इत्यादी तसेच सर्व यंत्रणा अतिशय सुंदर पद्धतीने राबवली. शासकीय यंत्रणेने कौतुकास्पद कामगिरी बजावली आणि मतदान शांततेत पार पाडले.
यामुळे आता सोमवार दिनांक 9 रोजी मतमोजणी कडे सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांच लक्ष लागून राहिलेले आहे.



