*शिमगोत्सवासाठी होळी स्पेशल जादा रेल्वे सोडण्याची अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची कोकण रेल्वेकडे मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिमगोत्सवासाठी होळी स्पेशल जादा रेल्वे सोडण्याची अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची कोकण रेल्वेकडे मागणी*
*शिमगोत्सवासाठी होळी स्पेशल जादा रेल्वे सोडण्याची अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची कोकण रेल्वेकडे मागणी*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-होळीचा सण 2 मार्चला असून, कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या सर्व मेल / एक्सप्रेसचे आरक्षण रिग्रेट झालेले आहे, दरवर्षी झिमगोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमनी मुंबईतून कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये जातात त्यासाठी 26 फेबु.ते 19 मार्च गुढीपाडव्यापर्यंत मुंबईतील CSMT, दादर, कुर्ला, दिवा, पनवेल, मुंबई सेंट्रल, वांद्रे, वसई, सुरत ते सावंतवाडी दरम्याने होळी स्पेशलच्या किमान 200 फेऱ्या चालवाव्यात, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईने कोकण रेल्वे, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेकडे केली आहे. शिमगोत्सव हा कोकणातील गणपती उत्सवानंतरचा सर्वात मोठा सण. कोकणात वर्षभर ग्रामस्थ / भावीक ग्रामदेवतेचे दर्शनासाठी मंदिरामध्ये जातात मात्र शिमगा हा एक असा उत्सव आहे की ग्रामदेवतेची पालखी ग्रामस्थांच्या घरोघरी येते, आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी मुंबईतील लाखो चाकरमनी आपल्या परिवारासोबत कोकणातील आपल्या गावी जातात. त्यासाठी जादा रेल्वेची आवश्यकता आहे.
कोकण रेल्वे, मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांनी होळी भावीकांच्या मागणीचा आदर करून जास्तीत जास्त होळी स्पे. रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर चालवाव्यात अशी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केल्याचे सेक्रेटरी यशवंत जडयार व अध्यक्ष शेखर बागवे यांनी सांगितले.



