*नंदुरबार तालुका विधायक समिती, रघुवंशी परिवारातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 21 लाख, आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशींनी सुपूर्द केला मुख्यमंत्र्यांना धनादेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुका विधायक समिती, रघुवंशी परिवारातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 21 लाख, आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशींनी सुपूर्द केला मुख्यमंत्र्यांना धनादेश*
*नंदुरबार तालुका विधायक समिती, रघुवंशी परिवारातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 21 लाख, आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशींनी सुपूर्द केला मुख्यमंत्र्यांना धनादेश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत नंदुरबार तालुका विधायक समितीतर्फे 18.50 लाख तर रघुवंशी परिवाराचा वतीने अडीच लाख असा 21 लाखाचा धनादेश मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. गोरगरीब, वंचित आणि गरजू नागरिकांना नैसर्गिक आपत्ती, गंभीर आजार किंवा अपघातांच्या वेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने आर्थिक मदतीचा लाभ देण्यात येतो.
नंदुरबार तालुका विधायक समिती व रघुवंशी परिवाराच्या माध्यमातून नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासण्यास येत असते. शिक्षण महर्षी, माजी आ. स्व.जी.टी पाटील, माजी आ. लोकनेते स्व.बटेसिंग रघुवंशी यांनी अथक परिश्रमातून विधायक समिती या शैक्षणिक संस्थेचे रोपटे लावले होते त्याचे आज वटवृक्षात रूपांतर होऊन मोठी शैक्षणिक चळवळ उभी राहिलेली आहे. या चळवळीत संस्थेचे चेअरमन आ.चंद्रकांत रघुवंशी, व्हा. चेअरमन उद्योगपती मनोज रघुवंशी, सचिव यशवंत पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे योगदान लाभत आहे. नंदुरबार तालुका विधायक समितीने शैक्षणिक चळवळीसह वेळोवेळी सामाजिक बांधिलकीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नंदुरबार तालुका विधायक समितीतर्फे 18.50 लाख तर रघुवंशी व परिवाराच्या वतीने अडीच लाख असा 21 लाखाचा धनादेश आ. चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशींनी सुपूर्द केला गोरगरीब, वंचित आणि गरजू नागरिकांना नैसर्गिक आपत्ती, गंभीर आजार किंवा अपघातांच्या वेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने आर्थिक मदतीचा लाभ देण्यात येतो.