ताजा खबरे:
*नवापूर पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी व्यापक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*
*विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे काळाची गरज-गटशिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील*
*धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्याकारी अधिकारी यांना अंगणवाडी कर्मचारी यांचा 1 दिवसीय संपाबाबत, अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन*
*वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय 'विद्यार्थी संवेदनशीलता मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न*
*IEEDSSA ॲथलेटिक्स स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे काळाची गरज-गटशिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे काळाची गरज-गटशिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील*

  • Share:

*विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे काळाची गरज-गटशिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील*
नंदूरबार(प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांच्या बालवयापासूनच विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला, तर भविष्यात याच विद्यार्थ्यांमधून विविध क्षेत्रांत कार्य करणारे अनेक शास्त्रज्ञ घडतील आणि ते देशाच्या प्रगतीस मोठा हातभार लावतील, असे प्रतिपादन गट शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील यांनी केले.
हिरा प्रतिष्ठान संचलित काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशु विहार नंदूरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या समारंभात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, हिरा प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेची वाटचाल मी सुरुवातीपासून जवळून पाहत आहे. संस्थापक अध्यक्ष कै. काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या उदात्त विचारांतून तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य आजही संस्थेचे पदाधिकारी यांनी अखंडपणे सुरू ठेवले आहे. या शाळेत शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक व आध्यात्मिक सेवाकार्यांवरही भर दिला जातो, ही बाब कौतुकास्पद आहे.
शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन हिरा उद्योग समूहाचे संचालक व युवा उद्योजक माननीय प्रणव रविंद्र चौधरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांचे कौतुक केले. विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो तसेच नवकल्पनांना चालना मिळते, असे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हिरा प्रतिष्ठानचे सहसचिव महेंद्र फटकाळ यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी सादर केलेले विज्ञान प्रकल्प, त्यामागील संकल्पना व कृती यांचे विशेष कौतुक केले. या उपक्रमासाठी विद्यार्थी, पालक तसेच मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या परिश्रमांचे त्यांनी अभिनंदन केले.
आशापुरी माता फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष दिनेश साहेबराव पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या गमतीजमतीवरील पुस्तके भेट देत सर्व बालवैज्ञानिकांचे कौतुक केले व विज्ञान शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक युवराज भामरे तसेच सौ. इंदूबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिराचे प्रभारी मुख्याध्यापक किरण त्रिवेदी उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सुमारे चाळीस विज्ञान उपकरणे सादर केली. कार्यक्रमास पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक युवराज भामरे यांनी केले. सूत्रसंचालन रूपेश चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती नयना सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. पल्लवी चौधरी, श्रीमती भारती मोरे या शिक्षिकांसह सुधाकर ठाकूर, रविंद्र चौधरी व शेखर पाटील यांचे सहकार्य लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नवापूर पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी व्यापक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*
February, 06 2026
*विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे काळाची गरज-गटशिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील*
February, 06 2026
*धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्याकारी अधिकारी यांना अंगणवाडी कर्मचारी यांचा 1 दिवसीय संपाबाबत, अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन*
February, 06 2026
*वसंतराव नाईक महाविद्यालयात एक दिवसीय 'विद्यार्थी संवेदनशीलता मार्गदर्शन’ कार्यशाळा संपन्न*
February, 06 2026
*IEEDSSA ॲथलेटिक्स स्पर्धेत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
February, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज