*नवापूर पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी व्यापक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापूर पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी व्यापक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*
*नवापूर पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी व्यापक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*
नवापूर(प्रतिनिधी):-नवापूर पंचायत समितीतील अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गट विकास अधिकारी देविदास देवरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या शिबिरात मधुमेह, सिकलसेल, उच्च रक्तदाब तसेच इतर विविध आजारांची तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी अविनाश मावची यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तालुका आरोग्य विभागाच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाने पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल वैद्यकीय तपासणी केली.
यावेळी बालविकास अधिकारी नरेश अहिराव, कार्यालय अधीक्षक हरीश अहिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश मावची, डॉ. निखिल कोठावदे तसेच तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. वैद्यकीय पथकाने कर्मचाऱ्यांचे रक्तदाब, साखर तपासणी, सिकलसेल तपासणी तसेच प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. गट विकास अधिकारी देविदास देवरे यांनी कर्मचाऱ्यांनी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असून आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन केले. कामाच्या ताणतणावामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अशा शिबिरांमुळे आजारांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार घेणे शक्य होते, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून आरोग्य विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.



