*धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्याकारी अधिकारी यांना अंगणवाडी कर्मचारी यांचा 1 दिवसीय संपाबाबत, अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्याकारी अधिकारी यांना अंगणवाडी कर्मचारी यांचा 1 दिवसीय संपाबाबत, अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन*
*धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्याकारी अधिकारी यांना अंगणवाडी कर्मचारी यांचा 1 दिवसीय संपाबाबत, अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन*
धुळे(प्रतिनिधी):-धुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्याकारी अधिकारी (म.बा. क.) यांना दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी अंगणवाडी कर्मचारी यांचा 1 दिवसीय संपाबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार सेवा निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस याना ग्राजुटी लागू करा. उच्च न्यायालय गुजरात यांच्या आदेशा नुसार सेविकांना 24800 रु. तर मदतनीस यांना 20400 र. लागू करा. अंगणवाडी कर्मचारी यांना पेन्शन लागू करा. अंगणवाडी कर्मचारी प्रोत्साहन भत्ता कामावर आधारित न देता तो त्यांना दर महा लागू करा, निकृष्ठ दर्जाच्या THR बंद करून त्या ऐवजी गरम व ताजा पोषण आहार देण्यात यावा. THR वाटपासाठी FRS आणि आहार वाटपासाठीची आधार नोंदणीची अट बंद करा. अंगणवाडी कर्मचारी यांना ONLINE कामाची सक्ती बंद करून योजना बाह्य कामे देण्यात येऊ नये. अंगणवाडी कर्मचारी यांना दर वर्षी 15 दिवसा ऐवजी 1 महिन्याची उन्हाळी सुट्टी देण्यात यावी. अंगणवाडी कर्मचारी यांना मागील थकबाकी सह चालू वर्षाची रिचार्ज रक्कम मानधना सोबत अदा करण्यात यावी. या व जिल्ह्यातील प्रश्न बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सादर निवेदन देण्यासाठी जिल्हातील सर्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे प्रकल्प प्रमुख उपस्थित होते. तसेच महिला व बालविकास विभाग अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी क्षेत्रीय अधिकारी यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला अंगणवाडी कर्मचारी यांनी निवेदन देऊन जाहीर पाठींबा व्यक्त केला. यावेळी युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील कार्य अध्यक्ष उपस्थित होते.